Join us  

युजरच्या कमेंटवर भडकली मानसी नाईक, कमेंट करताना आता दोन वेळा विचार करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:49 AM

काही महिन्यांपूर्वीच मानसी लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिने लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते.

''वाट बघतोय रिक्षावाला'' या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईक. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या खासगी आणि पर्सनल आयुष्यातील प्रत्येक घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकतेच एका युजरने अतिशय असभ्य कमेंट तिच्या फोटोवर केली. ही कमेंट पाहून मानसी नाईकचाही चांगलाच संताप झाला. शेवटी तिने एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून कमेंट करणा-या युजरचा चांगलाच समाचार घेतला. 

सेलिब्रेटींच्या काही गोष्टी आवडत नसतीलह म्हणून युजर भान विसरत शिवीगाळही करताना दिसतात. अशा युजर्सचा बेशिस्तपणा आता सोशल मीडियावर सहन केला जाणार नाही म्हणत सेलिब्रेटी संताप व्यक्त करताना दिसतात. तुम्ही मला बुधावर पेठेत कधी बघितले ? त्याच्या पोटापाण्यासाठी त्या काम करतात. बुधावर पेठेत काम करणा-या महिला मोठ्या धाडसाने मेहनत करतात, त्यांचे घर चालवण्यासाठी त्या छातीठोकुन प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करुन दाखवा असे मानसीने कमेंट करणा-याला तिच्याच भाषेत चांगलेच खडसावले आहे.

 

लाईव्हच्या माध्यमातून मानसीने बुधवार पेठेत काम करणा-या महिलांना देखील आदराने वागणुकीची गरज असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वीच मानसी लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिने लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते. 

कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, युजरने केलेल्या कमेंटवर शशांक केतकरचा चढला पारा, वाचा नेमके काय घडले

मध्यंतरी असाच प्रकार शशांक केतकरसोबतही घडला होता. त्यानेही वेळीच त्या कमेंट करणा-याला प्रत्युत्तर दिले होते. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, या गोष्टीला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि रसिकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. त्यासाठीच तर ही मालिका आहे” अशा शब्दात शशांकने त्याला खडसावलं.

टॅग्स :मानसी नाईक