Join us  

छेडछाडप्रकरणी या मराठी अभिनेत्याला करण्यात आली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 4:42 PM

मराठीतील एका अभिनेत्याला नुकतेच अटक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमंदार कुलकर्णीला अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंदारने या मुलीला जबरदस्तीने बिकनीवर शूट करण्यास भाग पाडले होते असा आरोप या पीडित तरुणीने केला आहे.

मंदार कुलकर्णीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने पक्के शेजारी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याने लग्नबंबाळ या व्यवसायिक नाटकात काम केले होते. त्याने आजवर पुण्यात अनेक नाट्यशिबीरं घेतली आहेत. पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्थेत तो कार्यरत आहे. त्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, मंदार कुलकर्णीला अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंदारने या मुलीला जबरदस्तीने बिकनीवर शूट करण्यास भाग पाडले होते असा आरोप या पीडित तरुणीने केला आहे. या मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ही मुलगी नाटकात काम करण्यासाठी पुण्याला आली होती. नाटकात काम करण्यासाठी सुरुवातीला फोटो शूट करावे लागते असे मंदार कुलकर्णाने या मुलीला सांगितले आणि त्यानुसार त्याने त्या मुलीला वनपीसमध्ये फोटो काढायला सांगितला. तिने देखील लगेचच वनपीसमध्ये फोटो काढला. त्यानंतर त्याने तिला बिकनीत फोटो काढायला सांगितले. मंदारची मागणी ऐकल्यावर ही मुलगी काहीशी गोंधळली आणि तिने यास नकार दिला आणि अशा कपड्यांमध्ये मी फोटो काढणार नसल्याचे तिने स्पष्ट केले. या मुलीने विरोध करून देखील मंदारने त्या मुलीकडून बिकनीमध्ये फोटोशूट करून घेतले. या मुलीचे कपडे काढून तिच्या पाठीचे उघडे फोटो जबरदस्तीने काढून घेतले. हे फोटोशूट केल्यानंतर याविषयी घरात सांगू नकोस असे तिला धमकावण्यात आले. 

टॅग्स :मराठी