मानसी येतीये बॉलीवुडमध्ये..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 00:17 IST
हंटर या हिंदी चित्रपटामधून सईची बॉलिवूड मध्ये धमाकेदार एन्ट्री झाल्यानंतर आता,मागोमाग धक धक गर्ल मानसीचा मोर्चा बी टाऊन कडे ...
मानसी येतीये बॉलीवुडमध्ये..
हंटर या हिंदी चित्रपटामधून सईची बॉलिवूड मध्ये धमाकेदार एन्ट्री झाल्यानंतर आता,मागोमाग धक धक गर्ल मानसीचा मोर्चा बी टाऊन कडे वळणार आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील बरेच हिरो हिरोईन्स हिंदी चित्रपटाकडे वळत आहे. एखादा हिंदी चित्रपट केला की करिअरला एक वेगळे वळणच लागते. त्यामुळे आता मानसी नाईक सुध्दा हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. ती कोणत्या हिंदी चित्रपटामधून पदापर्ण करणार आहे हे जरी गुलदस्त्यात असले तरी तीच्या चाहत्यांसाठी हे छान सरप्राईज ठरणार आहे. रिक्षा वाला या गाण्यामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा वेगळं व्यक्तीमत्तव निर्माण केलेल्या मानसी नाईकला माधुरी दिक्षीत सारखे बनायचे आहे. तसेच हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याचे स्वप्न होते व ते आता पूर्ण होताना दिसत असल्याचे लोकमत सीएनएक्स बरोबर बोलताना सांगितले.