Join us

मनमर्झिया शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 15:02 IST

 priyanka londhe                     अभिनेते शरद पोंक्षे आपल्याला नेहमीच नाटक, मालिका ...

 priyanka londhe                     अभिनेते शरद पोंक्षे आपल्याला नेहमीच नाटक, मालिका आणि चित्रपटातून वेगवेगळ््या भूमिकांमध्ये दिसले आहेत. आगामी मनमर्झिया या मराठी चित्रपटात देखील ते एका महत्वपुर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. शदर पोंक्षे यांनी या चित्रपटाविषयी आणि बदलत्या चित्रपटसृष्टी संदर्भात लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा संवाद... मनमर्झिया या चित्रपटातील तुमची भूमिका काय  असणार आहे ? -: या चित्रपटामध्ये मी हिरोच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या आधी मी अशा प्रकारच्या भूमिका केल्या आहेतच. परंतु या सिनेमात थोडी वेगळ््या शेडची भूमिका करताना तुम्ही मला पाहु शकाल. खर सांगायचं झाला तर वेगवेगळ््या प्रकारचे विषय आणणार तरी कुठून असा प्रश्न देखील उपस्थित होतो. परंतु माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.  या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही एकदम तरुण आणि नवीन टिम सोबत काम करत आहात त्यामुळे नवीन मुलांसोबत काम करताना भीती वाटत नाही का? -: आताच्या पिढीचा सर्वच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. शॉट घेण्याचा त्यांचा अँगल देखील डिफरंट असतो. मी अतिशय भयंकर निर्मात्यांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.  हा चित्रपट माझा नव्वदावा आहे. या तरुण मुलांसोबत काम करताना खरच छान वाटतय. तरुणाईचा जोश या सेटवर आम्हाला पाहायला मिळतोय. काहीतरी चांगल करायची या मुलांची ईच्छा आहे. त्यामुळे अशा टिमसोबत काम करायला मला आवडतेय. नवीन तंत्रज्ञानामुळे आता चित्रपट बदलतोय त्याबद्दल काय सांगाल?-: कॅमेरे आता अप्रतिम आलेत, पुर्वी मेकअप खुप करायला लागायचे. परंतु आता कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानामुळे चेहºयावरील पुळ््या लपवता येतात. पोट सुटले असेल तरी सिक्स पॅक दाखवता येऊ शकतात.  पुर्वी अमिताभ बच्चन शूटिंगसाठी लोकांनी जमावे यासाठी गावात फिरले होते, तेव्हा कुठे माणसे त्या सीनसाठी जमा झाली होती. परंतू आता  चित्रपटात केवळ तंत्रज्ञानामुळे स्टेडिअम देखील भरलेले दाखवता येते. त्यामुळेच बदलत्या तंत्रज्ञानासोबत कलाकारने बदलायलाच पाहिजे.  चित्रपट स्वीकारताना प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा विचार तुम्ही करता ?-: लोक जेव्हा घरी येतात कथा ऐकवतात तेव्हा कथा आवडली तरच मी सिनेमा स्वीकारतो. त्यानंतर पैसे आणि बाकिच्या गोष्टी ठरताता. शूटिंगसाठी तारखा दिल्या जातात. परंतु जोपर्यंत तुम्ही सेटवर जात नाही तो पर्यंत तुम्हाला त्या चित्रपटा विषयी काहीच समजत नाही. काम सुुरु झाल्यानंतर समजते की तो चित्रपट काय दर्जाचा असणार आहे. मी अशा अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत ज्याचे चित्रीकरण सुरु असतानाच समजायचे कि हा सिनेमा तीन वाजता थिएटर मध्ये लागणार आणि सव्वातीन वाजता तो पडणार. पण एकदा अशा सिनेमांचे काम सुरु झाले कि तुम्ही काहीच करु शकत नाही. मग अशा वेळी काम करायचे, तुमचे पैसे घ्यायचे आणि बाजुला व्हायचे एवढेच मी करतो. ग्रामीण भागापर्यंत चित्रपट किंवा नाटके पोहचत नाहीत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?-: नाटके किंवा चित्रपट ग्रामीण भागापर्यंत पाहेचविण्यासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु पुर्वी वर्तमानपत्राच्या अनेक पुरवण्या अगदी गावागावात जायच्या, त्यामध्ये नाटक आणि सिनेमाच्या जाहिराती असायच्या आणि मग लोकांना समजायचे असे नाटक आता येणार आहे. लोकांनी पैसे खर्च करुन सिनेमाला जायचे आणि जर तो चित्रपट वाईट निघाला तर लोकांना पश्चाताप नक्कीच होतो. पुर्वी परिक्षणे पाहुन लोके नाटक, सिनेमा पाहायला जायचे. आता निर्माते देखील ग्रामीण भागात जायला घाबरतात. पुणे-मुंबई मध्ये ते दिड-दोनशे प्रयोग करतात आणि थांबतात. आता कलाकार देखील मालिकांमध्ये काम करतना नाटकांचे प्रयोग करतात त्यामुळे त्यांना आठ दिवसांचे दौरे करता येत नाहीत. कलाकार नाटकांच्या दौºयांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. परंतू ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे.