Join us  

या अभिनेत्याच्या पत्नीसमोर झाला होता हस्तमैथुनाचा प्रयत्न, त्याच्या ट्विटमुळे उडाली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 11:35 AM

या अभिनेत्याच्या ट्विटमुळे सगळीकडे खूप खळबळ माजली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवनने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आज सुमितचा 49 वाढदिवस आहे. त्याच्या जन्म 22 एप्रिल 1971 ला झाला आहे. सुमीतने त्याच्या करियरची सुरुवात महाभारत या लोकप्रिय मालिकेतून केली होती. ज्यात त्याने बाल सुदामाची भूमिका साकारली होती.

सुमीत सोशल मीडियावर सक्रीय असून तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर आपलं मत व्यक्त करत असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा तो चर्चेतदेखील येतो. सुमीतने दोन वर्षांपूर्वी एक ट्वीट केले होते ज्यामुळे खूप खळबळ माजली होती. जेव्हाही सुमीतचे नाव घेतले जाते तेव्हा त्याच्या त्या ट्वीटची चर्चा होतेच. 

सुमीतने त्याच्या ट्वीटमध्ये सांगितले होते की, त्याची पत्नी आणि अभिनेत्री चिन्मयी सुर्वे मुंबईच्या विलेपार्ले भागात होती. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेल्या आणि ग्रे कलरचे कपडे घातलेल्या एका व्यक्तीने तिच्यासमोरच मास्टबेट करायला सुरुवात केली होती. ज्यामुळे त्याची पत्नी खूप घाबरली होती.

सुमीतने ट्विटरवरुन पोलिसांची मदत मागत त्या व्यक्तीच्या गाडीची डिटेल्स दिले होते. त्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही खूपच घृणास्पद कृती असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता की, ती दुपारची वेळ होती, मी घरी होतो आणि चिन्मयीने मला घाबरलेल्या अवस्थेत कॉल करुन ही गोष्ट सांगितली होती. तक्रार दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामुळे सगळीकडे खूप खळबळ माजली होती.

 

सुमीत राघवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सुमीतने मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने 'हद कर दी आपने', 'शादी नंबर 1' या चित्रपटात काम केले आहे.  

2004 ते 2006 दरम्यान साराभाई वर्सेज साराभाई मालिकेमधून तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने 'झलक दिखला जा सीजन 4' होस्ट केला. यानंतर तो पुन्हा एकदा 'साराभाई वर्सेज साराभाई टेक 2' मध्ये सुद्धा दिसला. याशिवाय त्याने काही हिंदी मालिकेत काम केले. 

 

टॅग्स :सुमीत राघवन