Join us  

'मल्हार' फेम अभिनेता देवदत्त नागेची मावशी आहे मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 4:59 PM

Adipurush Movie : 'आदिपुरुष'मध्ये मराठमोळा अभिनेता देवदत्त गजानन नागे (Devdatta Nage) हनुमानाची भूमिका साकारत आहे.

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासून वेगेवगळ्या कारणांमुळे चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे. आदिपुरुषमध्ये मराठमोळा अभिनेता देवदत्त गजानन नागे (Devdatta Nage) हनुमानाची भूमिका साकारत आहे. आज हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर देवदत्तचा लूक शेअर करण्यात आला आहे. देवदत्तच्या हनुमान लूकला पसंती मिळताना दिसते आहे. त्याचा या चित्रपटातील लूक शेअर करत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने देवदत्त तिचा भाचा लागत असल्याचे सांगितले आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे वीणा जामकर(Veena Jamkar).

अभिनेत्री वीणा जामकर हिने आदिपुरुष चित्रपटातील देवदत्त नागेचा लूक शेअर करत लिहिले की, आज मला एक बात सांगायची आहे... हा हनुमान, ऍक्टर देवदत्त नागे माझा वैयक्तिक आयुष्यात भाचा आहे आणि मी त्याची मावशी.. पण त्याला मी पहिल्यांदा भेटले होते. ' जय मल्हार ' च्या सेटवर..कुठल्या ना कुठल्या कौटुंबिक कारणामुळे आम्ही जन्मापासून आजपर्यंत फार भेटलोच नाही. अतिशय मेहनत, जिद्द आणि त्याच्या शरीरयष्टी सारखीच बलदंड इच्छाशक्ती.. ह्यांच्या जोरावर देवदत्त यशाची शिखरं चढतो आहे आणि चढतच राहिल...! त्याचा खूप अभिमान वाटतो तो फक्त ऍक्टर म्हणून नाही तर एक अतिशय नम्र, हुशार असा कुटुंबातला एक सदस्य म्हणून सुद्धा! 

ती पुढे म्हणाली की, मी एकतरी मालिका करावी म्हणून मला सतत motivate करत राहिला आणि तिथेच न थांबता आता तो माझा मार्गदर्शक आहे! मला काहीही अडचण आली की 'देवा' माझ्या मदतीला हजर असतो.. माझा इतका छान भाचा मला माझ्या लहानपणीच भेटायला हवा होता........ म्हणजे लुटूपुटूची 'मावशी - भाच्याची' जोडी गणपतीत खूप खेळली असती....असो. आज सकाळी हनुमान जयंतीच्या इतक्या सुंदर, अद्भुत शुभेच्छा मिळाल्या...! काय अप्रतिम पोस्टर आहे!!! अजून कोण बनू शकला असता ' हनुमान '?? बालम ( त्याचं घरातलं नाव). आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो!!!! तुझ्या जिद्दीला सलाम.तुझी सगळी सगळी स्वप्न पूर्ण होवोत अशी मन:पूर्वक प्रार्थना.... आदिपुरुषसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!!!!!!!

टॅग्स :देवदत्त नागेवीणा जामकर