Join us  

तेव्हा हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला...!  दिग्दर्शक महेश टिळेकर यांची अनुपम खेर यांच्यावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 1:48 PM

‘अनुपम खेर अब तेरी खैर नहीं,’ अशी पोस्ट लिहून टिळेकर यांनी अनुपम यांना लक्ष्य केले.

ठळक मुद्देविदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला अनुपम यांनी दिला. पण त्यांच्या या सल्ल्याने निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर चांगलेच खवळले.

भारतातील शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा, समाजसेविका ग्रेटा थर्नबर्ग आदी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भाष्य केल्यावर या आंदोलनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बाहेरच्या व्यक्तिंनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये, असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रिटींनी केला आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यापैकी एक. विदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला अनुपम यांनी दिला. पण त्यांच्या या सल्ल्याने निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर चांगलेच खवळले.

होय, फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी अनुपम यांच्यावर निशाणा साधला. ‘अनुपम खेर अब तेरी खैर नहीं,’ अशी पोस्ट लिहून टिळेकर यांनी अनुपम यांना लक्ष्य केले.

‘दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या भेटीनंतर अनुपम खेर मनातून पहिल्यांदा उतरले होते. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा द्यायला स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून अनुपम खेर हा किती मोठा ‘कल्लाकार’ आहे ते समजलं. तिथे जमलेला अफाट जनसमुदाय,प्रेस मीडिया यांच्या समोर स्वत: ची लाल करून अण्णा हजारे बद्दल कळवळा दाखवणारा हा संवेदनशील कलाकार, दिल्लीत शेतक-यांना पाठिंबा द्यायला किंवा साधं भेटायला जाण्याचं धाडस का दाखवत नाही? का तो आता एका पक्षाचा कुणीतरी आहे म्हणून सोयीप्रमाणे भूमिका बदलली याने?अण्णा हजारे यांना दिल्लीत जाऊन पाठिंबा देताना देशभरात अण्णांची हवा होती पण हीच हवा कालांतराने निघून गेल्यावर अनुपम खेर नंतर कधी अण्णांच्या वा-याला ही उभा राहिला नाही की त्यांची भेट घ्यायला राळेगणसिद्धी गावी गेल्याचे ऐकिवात नाही,’अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली.

 वाचा, महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट त्यांच्याच शब्दांत...

लोकांचं प्रेम मिळून लोकप्रिय यशस्वी झालेल्या या काही कलाकारांची अवस्था आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरा सारखी असते. मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो,तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांच्या कडून कौतुक होते वाहवा मिळते म्हणून मोर खुश असतो.पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग (मागचा भाग) हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. काहीशी अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे असं मला वाटतं., असेही त्यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे. 

 

टॅग्स :अनुपम खेर