Join us  

महेश मांजरेकरांची तिसरी लेकही आहे अभिनेत्री, दिसते खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 7:00 AM

महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी जणांना माहित आहे.

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठीत आपली छाप उमटविली आहे. महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी जणांना माहित आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. त्यातील सई मांजरेकर हिने दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय दुसरी लेक गौरी इंगवलेसुद्धा अभिनेत्री आहे.

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता या कॉस्टयूम डिझायनर आहेत.मात्र मेधा मांजरेकर हिच्यासोबत काम केल्यावर त्यांचे प्रेम जुळून आले. १९९५ साली महेश मांजरेकर आई चित्रपट बनवत होते. त्यावेळी मेधाशी त्यांची ओळख झाली.

आपल्या या चित्रपटात मेधानेच काम करावे म्हणून त्यांनी तिला विनवणी केली. मात्र अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसतानाही सौंदर्यावर घायाळ झालेल्या महेश मांजरेकरांनी तिला अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र मेधाला काही सुचेना काय करावे कारण मेधाला त्यावेळी परदेश दौरा करायचा होता तो करून आल्यावरच मी तुमच्या चित्रपटात काम करेन अशी अट मेधाने घातली आणि मग काय इथूनच त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

महेश मांजरेकर यांना सई, अश्वामि या २ मुली आहेत तर सत्या नावाचा एक मुलगा. तर गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील ते आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळतात. 

गौरीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले आहे.

तसेच ओवी या नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

गौरी लवकरच 'पांघरुण' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :महेश मांजरेकर मेधा मांजरेकर