Join us  

De Dhakka 2 viral Memes : ‘दे धक्का 2’ थिएटरमध्ये बघालच, त्याआधी हे व्हायरल मीम्स बघा...!  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 4:12 PM

De Dhakka 2 viral Memes : होय, ‘दे धक्का 2’ रिलीज होण्यापूर्वी यावरचे अनेक भन्नाट, मजेशीर मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...

De Dhakka 2 viral Memes : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आता याच चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘दे धक्का 2’ तुमच्या आमच्या भेटीस येतोय. यावेळी ‘दे धक्का 2’ची  (De Dhakka 2) स्टोरी लंडनमध्ये घडताना दिसणार आहे. मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव यांचे धम्माल विनोद पोटभरून हसवणार आहेत. येत्या 5 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच आणि ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटही बघणार असाल. पण त्याआधी ‘दे धक्का 2’वरचे हे भन्नाट मीम्स तुम्ही चुकवायला नकोत.होय, ‘दे धक्का 2’ रिलीज होण्यापूर्वी यावरचे अनेक भन्नाट, मजेशीर मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाहा तर...

उद्या सिक लिव्ह मिळावी म्हणून आदल्या दिवशी..

 कुवतीपेक्षा सुंदर क्रशला प्रपोज करण्याचा निर्णय घेतल्यावर...

  बुवा मला बाई बनव...

 एक, दोन पावसाळी ट्रेक केल्यावर नवखे ट्रेकर्स...

 चुकून आईच्या मोबाईल मधले गुड मॉर्निंगचे स्टिकर डिलीट झाले...

 घरात अलेक्सा आणल्यावर मी...

 चहाचं दूकान टाकतोय पुढच्या महिन्यात...

 

‘दे धक्का 2’ हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता.‘दे धक्का’ चित्रपटातील सर्व कलाकार ‘दे धक्का 2’मध्येही दिसून येणार आहेत. यावेळी कथा लंडनमध्ये घडताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत. ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील 2006मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता.  

टॅग्स :दे धक्का 2सिद्धार्थ जाधवमकरंद अनासपुरेसिनेमामिम्स