Join us

‘मेड इन महाराष्ट्रा’चे म्युझिक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 19:33 IST

मेड इन इंडिया हे बॅ्रण्ड नेम सर्वांना परिचीत आहेच. मात्र आता आपणास ‘मेड इन महाराष्ट्र’ या आगामी मराठी चित्रपटाचा ...

मेड इन इंडिया हे बॅ्रण्ड नेम सर्वांना परिचीत आहेच. मात्र आता आपणास मेड इन महाराष्ट्र’ या आगामी मराठी चित्रपटाचा परिचय लवकरच होणार आहे.श्री सिद्धी विनायक प्रसन्न क्रिएशन निर्मित हा चित्रपट असून जी मीडिया-इंटरटेनमेंट आणि ए.आर. क्रिएशन सादर करणार आहेत. तर नितेश पवार हे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे म्युझिक नुकतेच दादर (मुंबई) येथे सर्व कलाकारांसमवेत रिलीज झाले. यावेळी निर्माता, दिग्दर्शक तसेच श्री सिद्धीविनायक मंदीर ट्रस्टचे विश्वस्त श्री सतिश पाडवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चित्रपट अमिनेते भाऊ कदम, अरूण नलावडे, जीतू गोसावी, प्रिया गामरे, प्रविण गर्जे, शितल गायकवाड आदी उपस्थित होते. या चित्रपटाला संगीत विलास गौरव तर गीत दिपक अंजेवर यांनी दिले आहे. चित्रपटात पाच गाणी आहेत.