Join us  

‘प्रेम करा मात्र बनावट नको’,फेक अकाऊंट्मुळे वैतागली मयुरी देशमुख !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 6:55 AM

सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे ही बाब आज प्रत्येकालाच माहिती आहे. याला सेलिब्रिटी मंडळीसुद्धा अपवाद नाहीत. सद्य स्थितीत प्रत्येक ...

सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे ही बाब आज प्रत्येकालाच माहिती आहे. याला सेलिब्रिटी मंडळीसुद्धा अपवाद नाहीत. सद्य स्थितीत प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. या माध्यमातून ते आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतात. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ते आपल्या फॅन्सशी कनेक्ट असतात. कारण या माध्यमातून त्यांना आपल्या फॅन्सशी थेट कनेक्ट होता येतं. तसंच आपल्या भूमिकांविषयी रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेता येतात. शिवाय आपल्या सिनेमा, मालिका तसंच आगामी प्रोजेक्ट्सचं प्रमोशनही त्यांना या माध्यमातून करता येतं. मात्र एखाद्या माध्यमाचे जितके फायदे असतात तितकेच तोटेसुद्धा असतात. कारण काही व्यक्ती सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे वारंवार पाहायला मिळालं आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एकाच सेलिब्रिटीच्या नावाने अनेक अकाऊंट असल्याचे पाहायला मिळतं. फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामने निळी रंगाची टिक ही अधिकृत अकाऊंटसाठी दिशादर्शक ठरवली असली तरी सेलिब्रिटींचे फॅन्स आपल्या लाडक्या कलाकारांच्या नावाने विविध अकाऊंट ओपन करत असतात. हे फॅन्सचे त्या सेलिब्रिटीवरील प्रेम असलं तरी अनेकदा याचा सेलिब्रिटींना त्रासच सहन करावा लागतो. हीच बाब छोट्या पडद्यावरील खुलता कळी खुलेना मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्याबाबतही घडली आहे.मयुरीच्या नावाने सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट्स आहेत. फक्त मयुरीच नाही तर मयुरीचा पती आणि तिच्या नातेवाईकांच्या नावानेही असे फेक अकाऊंट्स बनवण्यात आले आहेत. या अकाऊंटमध्ये मयुरीच्या फोटोंचाही वापर करण्यात आला आहे.या सगळ्या प्रकारामुळे मयुरी चांगलीच वैतागली आहे. नुकतंच तिने या सगळ्या फेक अकाऊंटचे स्क्रीन शॉट्स काढून फेसबुकवर शेअर केले आहेत.मयुरी श्लोक अग्निहोत्री, मॅरीड टू श्लोक अग्निहोत्री अशा अकाऊंट्सचा या फेक अकाऊंटमध्ये समावेश आहे.केवळ मयुरीचे फेक अकाऊंटच बनवण्यात आलं नसून त्यावर तिचे, तिच्या पतीचे आणि नातेवाईकांचेही फोटो वापरले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मयुरी चांगलीच वैतागली असून याची तिने सायबर सेलकडेही तक्रार केली आहे. आता सायबर सेल या सगळ्या फेक अकाऊंट्सचा छडा लावत असल्याची माहितीही तिने आपल्या पोस्टमधून दिली आहे. Also MUST SEE: मानसी म्हणजेच मयुरी देशमुखचा वेल्डींग अल्बम