Join us  

सुप्रिया पिळगांवकर यांचा 90च्या दशकातील फोटो पाहून विसराल आताच्या ग्लॅमरस नायिकांना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 8:00 AM

सुप्रिया पिळगांवकर यांनी 90च्या दशकातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

सुप्रिया पिळगांवकर यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांंच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लॉकडाउन असलेल्या सुप्रिया पिळगांवकर सोशल मीडियावर सक्रीय झाल्या आहेत आणि तिथे त्या फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 90च्या दशकातील त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या खूप ग्लॅमरस दिसत आहेत.

सुप्रिया पिळगांवकर यांनी 90च्या दशकातील फोटो शेअर करत लिहिले की, 1993 साली पोर्टफोलिओसाठी केलेले शूट. 

सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म महाराष्ट्रीय कुटुंबात 16 ऑगस्ट, 1967 साली मुंबईत झाला. त्यांनी 1985 साली प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्यासोबत लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगी आहे. जिचे नाव श्रिया आहे आणि ती सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. 

सुप्रिया यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात मालिकेतून केली. तू तू मैं मैं, कुछ रंग प्यार के ऐसा भी, ससुराल गेंदा फूल, राधा की बेटियां कुछ कर दिखायेंगी आणि कडवी खट्टी मीठी या मालिकेत काम केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटातही काम केले आहे.

नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. आवारा पागल दीवाना, ऐतबार व दीवाने हुए पागल आणि बरसात या हिंदी चित्रपटातही झळकल्या आहेत.

 

टॅग्स :सुप्रिया पिळगांवकर