Join us  

lockDown दरम्यान सईचा लूक आला समोर, मेकअपविनाही खुलले सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 12:00 PM

सईदेखील पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली असून लॉक डाऊनदरम्यानही ती चाहत्यांसह तिच्या खास गोष्टी शेअर करत असते.

सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.  सई सोशल मीडियावरही सक्रिय असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. सोशल मीडियापासून दूर असल्याने तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट्स किंवा फोटो तसंच व्हिडिओ पाहायला मिळत नव्हते. त्यामुळे चाहते काहीसे हिरमुसलेले होते. मात्र आता सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्यामुळे सामान्यांसह सारेच कलाकार घरात बंदिस्त आहे. त्यामुळे आपले आवडते कलाकार त्यांचा वेळ कसा घालवत आहेत. हे जाणून घेताना चाहते दिसतायेत. 

 

अशातच सईदेखील पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली असून लॉक डाऊनदरम्यानही ती चाहत्यांसह तिच्या खास गोष्टी शेअर करत असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करत आहेत. सईनेदेखील इतरांप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान तिचा एक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. या फोटोत सईने कोणत्याही प्रकारचा मेकअप केला नसून तिचा हा फोटो विनामेकअपच आहे.

 

विनामेकअपमध्येही सई खूप सुंदर दिसते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणेच  ऑफस्क्रीनलूकलाही सर्वाधिक पसंती मिळत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते तिला भरभरून कमेंटस आणि लाईक्स करत आहेत. विनामेकअपमध्येही सईचे सौंदर्य खुलले आहे. सईने या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. 

तसेच सई आज लोकमत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळी ५ वाजता गप्पा मारणार आहे. सईसोबत तुम्हालाही देखील संवाद साधायचा असेल तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहायला विसरू नका आज संध्याकाळी ही खास मुलाखत. 

टॅग्स :सई ताम्हणकरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस