Join us  

​सुप्रिया पिळगावकर यांच्या घरातल्यांच्या भीतीमुळे सचिन पिळगांवकर या पत्त्यावर पाठवायचे त्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 10:51 AM

नव्वदीच्या दशकावर आधारित असलेला सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा नवीन शो 'यह उन दिनों की बात है'ने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली ...

नव्वदीच्या दशकावर आधारित असलेला सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा नवीन शो 'यह उन दिनों की बात है'ने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक ओढ निर्माण केली आहे. या मालिकेबाबत सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर देखील रंगलेली आहे. टेलिव्हिजनवरील कलाकार देखील या मालिकेची प्रशंसा करत आहेत. 'यह उन दिनों की बात है' या मालिकेच्या सेटची देखील सध्या चांगलीच चर्चा आहे. प्रेक्षकांना नव्वदच्या दशकाचा अनुभव घेता यावा यासाठी या मालिकेच्या टीमने चांगलेच संशोधन केले आहे. या मालिकेचा सेट खूपच चांगल्याप्रकारे बांधण्यात आला आहे. या मालिकेचा सेट, या मालिकेची कथा, मालिकेतील पात्र यांमुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात पडले आहेत. प्रेक्षकांप्रमाणेच अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांना देखील ही मालिका खूप आवडत आहे. त्यांनी नुकतेच शशी आणि सुमीत मित्तल या निर्मात्यांचे या मालिकेसाठी अभिनंदन केले. सुप्रिया यांनी त्यांचे पती सचिन पिळगावकर यांच्यासोबतचा एक नव्वदच्या दशकातील फोटो पोस्ट करून या मालिकेसाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच ही मालिका खूप चांगली असून ही मालिका पाहाताना आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. याविषयी सुप्रिया पिळगांवकर सांगतात, "यह उन दिनों की बात है ही मालिका मी आवर्जून पाहाते. माझ्या कुटुंबियांसोबत ही मालिका पाहात असताना मला जुन्या दिवसांची आठवण येते. त्या दिवसाच्या स्मृतींचे स्मरण मी टप्प्याटप्प्याने करते. माझ्या घरात सचिन आणि माझ्या प्रेमप्रकरणाविषयी माहित नसल्याने मला ते माझ्या मैत्रिणीच्या पत्त्यावर पत्र पाठवत असत. तसेच अंधेरी पूर्व ते पश्चिम हे अंतर पार करून सचिन यांना भेटण्यासाठी मी त्यावेळी सायकल शिकले होते. मी एक तास सायकल चालवण्यासाठी त्यावेळी एक रुपया मोजत होते. निर्माते शशी आणि सुमीतच्या वास्तविक जीवनातून प्रेरणा घेऊन सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनची यह उन दिनों कि बात है ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत आपल्याला नव्वदीच्या काळातील एक प्रेमकथा पाहायला मिळत आहे. त्याकाळी स्मार्ट फोन्स नव्हते. त्यामुळे तो एक वेगळाच काळ होता. हाच काळ या मालिकेमुळे प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळत आहे. Also Read : ​सचिन पिळगांवकरांना या कलाकारामध्ये दिसते त्यांचे बालपण