Join us  

लक्ष्मिकांत बेर्डेंची लेक स्वानंदीच्या व्हाइट ड्रेसमधील व्हिडीओला मिळतेय चाहत्यांची पसंती, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 7:00 AM

स्वानंदी बेर्डेच्या व्हाइट ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची खूप पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे ती चर्चेत येत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर व्हाइट ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या ड्रेसमधील फोटोंना आणि व्हिडीओंना खूप पसंती मिळताना दिसते आहे.

स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर व्हाइट ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हाइट ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तिच्या या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुले अभिनय क्षेत्रात डेब्यू करणे ही आता काही नविन बाब राहिलेली नाही. असेच काही मराठी सिनेइंडस्ट्रीतही पाहायला मिळते आहे. यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे.

स्वानंदी बेर्डे हिने नुकतेच धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या नाटकात तिच्यासोबत तिची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डेदेखील मुख्य भूमिकेत होत्या.

या नाटकाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. याशिवाय स्वानंदी बेर्डे 'रिस्पेक्ट' या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे