Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीनं ठेवलं वडिलांच्या पावलांवर पाऊल, स्वानंदीच्या पदार्पणातील चित्रपट भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:38 PM

Laxmikant Berde's daughter Swanandi Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

बॉलिवूडच्या स्टारकिड्सप्रमाणेच मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टारकिड्सदेखील चर्चेत येत असतात. तशीच मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक स्टार किड आहे जी पदार्पणाआधीच हिट ठरली आहे. ही स्टारकिड दुसरी तिसरी कुणी नसून दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डें (Laxmikant Berde) आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) यांची लेक स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde). स्वानंदी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव रिस्पेक्ट असून या चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे. हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे. धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर आता ती चित्रपटात झळकते आहे.

स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. तिचा पदार्पणातील चित्रपट रिस्पेक्ट लवकरच भेटीला येतो आहे. याचा ट्रेलर तिने शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करून तिने लिहिले की, ५ वर्षांच्या अपेक्षेनंतर, कठोर परिश्रमानंतर आणि माझ्या प्रियजनांच्या प्रचंड पाठिंब्यानंतर, माझा पहिला प्रोजेक्ट रिलीज होतो आहे. या कथेचे साक्षीदार होण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण माझ्याकडे पूर्णपणे होते आणि या चित्रपटातील लोकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. रिस्पेक्ट चित्रपट २२ मे रोजी झी ५ आणि झी टॉकिजवर भेटीला येतो आहे. 

स्वानंदी बेर्डे हिने 'रिस्पेक्ट' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेस्वानंदी बेर्डेप्रिया बेर्डे