Join us  

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ऑनस्क्रीन आईलाच समजायचे खरी आई,अभिनयातच नाही तर राजकारणातही होत्या सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 9:00 AM

लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.

कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे साऱ्यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. साऱ्यांचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.

लक्ष्यासोबत झळकणारे कलाकारही आजही रसिकांच्या चांगल्याच लक्षात आहे. यापैकीच एक म्हणजे लक्ष्याची ऑनस्क्रीन आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अलका इनामदार.अलका यांनी दिनकर इनामदार यांच्यासह लग्न केले होते. दिनकर इनामदार देखील नाटय, सिनेकलावंत होते पतीसोबतच अलका यांनीदेखील अभिनय करायला सुरुवात केली. अनेक नाटकातही त्यांच्याबरोरीने त्यांनी काम केले होते.

 

दिनकर इनामदार यांनी 'झपाटलेला' या चित्रपटात धनाजीराव ही भूमिका साकारली होती. ब्लॅक एंड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून दोघेही अभिनयक्षेत्रात सक्रीय होते. अलका यांनी मोठा पडदा असो की रंगभूमी आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली होती. 

अनेक सिनेमात त्यांनी लक्ष्याच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे अलका इनमदारच लक्ष्याच्या खरी आई असल्याचा समज चाहत्यांचा झाला होता. खाष्ट सासु साकारण्यापेक्षा अलका यांनी साकारलेली मायाळु आईचा रसिकांना जास्त भावली.'माहेरची साडी',' हृदयस्पर्श', 'आई पाहिजे', 'दे दणादण', 'मुंबईचा फौजदार', 'शेम टू शेम' यांसारखे अनेक चित्रपटात अलका यांनी भूमिका साकारल्या आणि त्या तितक्याच गाजल्या. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही पडद्यावरील त्यांची एनर्जी इतर कलाकारांनाही प्रेरणा द्यायची.

अलका या अभिनयातच नाहीतर राजकारणातही सक्रीय होत्या. कोल्हापूरच्या महानगर पालिकेत नगरसेविका म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. मंगळवार पेठ येथुन अपक्ष म्हणुन त्या निवडुन आल्या होत्या. अखेर २२ जानेवारी २००४ रोजी अलका इनामदार यांचे निधन झाले. अलका इनामदार त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या आठवणीत सदैव राहतील.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे