Join us  

ललित प्रभाकरचा शायराना अंदाज, मनातल्या भावना शायरीच्या माध्यमातून सोशल मीडियावर केल्या शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 4:44 PM

आपल्या मनातील भावना आणि मूड या शायरीच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच चि. व चि.सौ.कां या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. याशिवाय 'ढोल ताशे' आणि 'पती गेले गं काठेवाडी' यासह विविध नाटकतही त्याने प्रमुख तसंच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्याला चित्र काढायलाही आवडतात. विविध रंगाशी खेळत प्रतिमा रेखाटणं त्याला आवडतं. नुकतंच त्याच्या अंगी असलेला आणखी एक गुण साऱ्या जगाला कळला. त्याच्यात एक संवेदनशील आणि हळव्या मनाचा गझलप्रेमी दडला असल्याचे साऱ्यांना समजलं. ललितनं सोशल मीडियावर शेअर केलेली एक गझल साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. 

आपल्या मनातील भावना आणि मूड या शायरीच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त केल्या. “वक्त की कैद में जिंदगी हैं मगर, चंद घडिंयाँ यहीं हैं जो आजाद हैं… इनको खोकर मेरी जाने-ए-जान, उम्रभर ना तरसते रहो”, ही शायरी ललितने सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रसिद्ध गझलकार फैय्याज हाशमी यांनी लिहिलेली आणि पाकिस्तानी गायिका फरिदा खानुम यांनी स्वरबद्ध केलेली ही गझल आहे. ललितने शेअर केलेल्या या गझलवर रसिकांकडून आणि गझलप्रेमींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नुकताच त्याने एक फोटो पोस्ट केला होता.त्यात रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल आणि दाढी यामुळे ललित सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे. मात्र ललित प्रभाकरच्या या फोटो मागे दडलंय एक खास रहस्य. ते म्हणजे लवकरच  हिंदी रिमेक  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ असं तेलुगू चित्रपटाचं नाव आहे, ज्याचा हिंदी रिमेक प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार विजय देवरकोंडा हा सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला असून त्याच्या लूकने कलाकारसुद्धा प्रभावित झाले आहेत. ललित प्रभाकर यानेसुद्धा हुबेहूब अर्जुन रेड्डीसारखा लूक केला आहे. त्याच्या या लूकमुळे ललित अर्जु रेड्डीचा जबरा फॅन असल्याचे स्पष्ट होते.  

टॅग्स :ललित प्रभाकर