Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठी अभिनेत्याने स्विमिंग करतानाचा फोटो केला शेअर, त्याच्या बॉडीची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 14:43 IST

या अभिनेत्याच्या फिटनेसची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगते. 

ठळक मुद्देललितने त्याचा स्विमिंग करतानाचा एक फोटो शेअर करतानाचा फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, लाटांसोबत पार्टी...

ललित प्रभाकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ललितने त्याचा स्विमिंग करतानाचा एक फोटो शेअर करतानाचा फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, लाटांसोबत पार्टी... हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ चार तासांत 20 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तुझी बॉडी खूपच छान आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.  

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच चि. व चि.सौ.कां या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. याशिवाय 'ढोल ताशे' आणि 'पती गेले गं काठेवाडी' यासह विविध नाटकतही त्याने प्रमुख तसंच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

ललित त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या फिटनेससाठी ओळखला जाते. त्याच्या फिटनेसची चर्चा त्याच्या फॅन्समध्ये नेहमीच रंगते. 

टॅग्स :ललित प्रभाकर