Join us

संग्राम बनला कुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 14:32 IST

तुमच्यासाठी काय पण म्हणणारा संग्राम प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. त्याचा डॅशिंगपणा म्हणा या त्याचा कॉश्च्युम या गोष्टींवर प्रेक्षकांनी संग्रामला ...

तुमच्यासाठी काय पण म्हणणारा संग्राम प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. त्याचा डॅशिंगपणा म्हणा या त्याचा कॉश्च्युम या गोष्टींवर प्रेक्षकांनी संग्रामला भरभरून प्रेम दिले आहे. पण हाच तडाखेबाज संग्राम अचानक कुक बनला आहे.आश्चर्य वाटले ना, पण हो संग्रामने स्वयंपाक करतानचा फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. नुसता फोटोच नाही तर त्याने चक्क स्वयंपाक करतानाचा हा एक  झक्कास सेल्फी काढला आहे. या फोटोमधून संग्रामचे सेल्फी प्रेमदेखील लक्षात येत आहे. पण त्याने नक्की खायला काय बनविले आहे हे लक्षात येत नाही. पण संग्रामने बनविले म्हणजेच नक्कीच काहीतरी चवदार व खमंग पदार्थ असेल असे वाटते. असो, पण तुमच्यासाठी काय म्हणणारा  संग्राम याने नक्कीच कोणासाठी तरी हा खास पदार्थ बनविला असणार हे मात्र नक्की.