Join us

जितेंद्र यांच्या हस्ते 'सारंग'चे लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:06 IST

सारंग या अल्बमच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  विचार सामान्य लोकांपर्यंत ...

सारंग या अल्बमच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अल्बमची निर्मिती करण्यात आलीय. या अल्बममध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांनी गाणी गायली आहेत. हरिहरन, शंकर महादेवन, श्रेया घोशाल, सुखविंदर सिंग आणि डॉ. भावना धाबरे यांचा आवाज आपल्याला या अल्बममध्ये ऐकायला मिळणार आहे. या अल्बमचे संगीतकार आहेत राजेश धाबरे. संगीतकार राजेश धाबरे यांचा हा बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित हा चौथा अल्बम आहे.