Join us  

जितेंद्र जोशीचे मन आणि पोट या गोष्टीने तृप्त झालं, सोशल मीडियावर केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 9:59 AM

उत्तम आणि स्वादिष्ट खाणं अनेक सेलिब्रिटींना आवडतं. अशाच खवय्ये कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

कलाकार अभिनयाचे शौकिन असतात तितकेच जीवनातील इतर गोष्टींचेही. कुणाला वर्कआऊट करायला आवडतं तर कुणाला फिरायला आवडतं. काही कलाकारांना खायला आवडतं. उत्तम आणि स्वादिष्ट खाणं अनेक सेलिब्रिटींना आवडतं. अशाच खवय्ये कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नुकताच जितेंद्रने त्याला आवडलेल्या एका मेन्यूचं सोशल मीडियावर कौतुक केले आहे. जितेंद्र नुकताच म्हैसूरमध्ये होता. म्हैसूरमधील नझरबाद इथल्या मुख्य रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये डोसा खाल्ला.

इथला डोसा जितेंद्रला इतका आवडला की त्याने या डोशाचं आणि त्याच्या चवीचं सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले आहे. हा डोसा खाल्ल्यानंतर लगेचच तोंडात असा काही विरघळतो की मन तृप्त होतं असंही जितेंद्रने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. म्हैसूरला आलात तर विनायका मायलरी इथल्या डोशाचं आस्वाद जरूर घ्या असं जितेंद्रने आपल्या फॅन्सना सांगितले. इतकंच नाही तर जीवनात एकदा तरी हा डोसा खाण्यासाठी इथे जरूर या असं सांगायलाही जितेंद्र विसरला नाही.  डोसाप्रेमींनी तर चुकवू नये असं हे ठिकाण आहे असं जितेंद्रने सांगितले. 

 

AlSo Read:Tanushree Dutta Controversy: जितेंद्र जोशीने दिली ही प्रतिक्रिया

तनुश्री दत्ता प्रकरणावर  अभिनेता जितेंद्र जोशी याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, एक बाजू ऐकून कमेंट करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे नानांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. जितेंद्र जोशी म्हणाला की, एक गोष्ट घडते त्यावर सगळेच जण प्रतिक्रिया देत सुटतात. तर्कवितर्क लावण्यापेक्षा दोघांची बाजू समजून घेतली पाहिजे. मी नानांच्या प्रतिक्रियेची वाट बघेन. त्यांची बाजू ऐकायला हवी. आपण एक बाजू ऐकून पटकन रिअॅक्ट होतो. त्यातले काय खरे काय खोटे हे माहित नसताना त्यावर आपले मत व्यक्त करणे चुकीचे आहे. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता या दोघांचाही अपमान होता कामा नये. दुसऱ्याच्या आयुष्यावर शितोंडे उडविणे योग्य नाही. त्यामुळे नानांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणे उचित ठरेल. दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत. आता तर हा वाद केवळ बॉलिवूडमधील ‘कास्टिंग काऊच’पुरता मर्यादीत न राहता त्याला राजकीय रंग मिळू पाहतोय. 

टॅग्स :जितेंद्र जोशी