Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गंमत जंमत' चित्रपटातील 'या' अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 09:00 IST

मराठमोळी ही अभिनेत्री सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

गंमत जंमत हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळाली होती. आजही हा चित्रपट आणि त्यातील गाणी रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, चारूशीला साबळे, सतीश शाह, सुधीर जोशी, श्रीकांत मोघे, आशालता आणि विजू खोटे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील अश्विनी ये ना हे गाणे खूप लोकप्रिय ठरले होते. हे गाणे अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री चारूशीला साबळे यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. चारूशीला साबळे सध्या सिनेइंडस्ट्रीमध्ये कार्यरत नाहीत.

अभिनेत्री चारूशीला साबळे शाहिर साबळे यांची लेक आहे. त्या एक अभिनेत्री सोबत उत्तम नृत्यांगणा आहेत. चारूशीला साबळे यांनी बऱ्याच मराठी चित्रपटात काम केले आहे.

चारूशीला साबळे यांनी १९८२ साली त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात केली. त्यांनी गंमत जंमत चित्रपटाशिवाय मी सिंधुताई सपकाळ, गाव तसं चांगलं, यमाच्या गावाला जाऊ या, ऑक्सिजन या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी अंजाने रिश्ते, कयामत से कयामत तक या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय त्यांनी हिंदी मालिकेतही काम केले आहे.

चारूशीला साबळे यांनी अभिनेता अजित वच्छानी यांच्यासोबत लग्न केले होते. अजित वच्छानी यांचे २५ ऑगस्ट, २००३ साली निधन झाले. चारूशीला आणि अजित यांना दोन मुली आहेत. त्यांचे नाव आहे योहाना आणि त्रिशला. त्रिशला एअर हॉस्टेस आहे तर योहाना हीदेखील अभिनेत्री आहे.