Join us

इंद्र रे आॅफ होप लघुपट लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 16:25 IST

उर्फी या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब या कलाकारासोबत झळकलेला अभिनेता आनंद बुरड हा इंद्र रे आॅफ होप या लघुपटात ...

उर्फी या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब या कलाकारासोबत झळकलेला अभिनेता आनंद बुरड हा इंद्र रे आॅफ होप या लघुपटात झळकणार आहे. या लघुपटाची कथा व पटकथा समीर सकपाळ व आनंद बुरड यांनी लिहली आहे. तर लघुपटाच पार्श्वगीत कौस्तुभ गायकवाड यांने गायले आहे. संगीत दिग्दर्शन पराग फडकर यांनी केले आहे. निर्माते किशोर ढोकले व सुधीर भालेकर आहेत. तसेच सहाय्यक निर्माते प्रदीप बुरड आणि दत्तात्रय होनाले आहे. सध्याची बळीराजाची दयानीय परिस्थिती, सरकारतर्फे राबविल्या जाणाºया योजना शेतकºयापर्यत पोहोचतात का, कुटूंबाचा कर्ता पुरूष गेला तर यामगे ढासळणारा त्यांचा परिवारआणि सावकारी जाज आणि माज दाखविण्याचा प्रयत्न इंद्र रे आॅफ होप या लघुपटाच्या मांडण्यात आला आहे. या लघुपटात मुख्य भूमिकेत अभिनेता आनंद  बुरड असून गणेश शिंदे, पल्लवी कुलकर्णी पकंज चव्हाण, भाऊसाहेब गव्हाणे वेदांत कांबळे, कैलास ढोकले या कलाकारांचा समावेश आहे.