आदर्श म्हणतोय, चल प्रेमाची कुस्ती खेळूया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 13:03 IST
मराठी चित्रपटसृष्टीतील गायक आदर्श शिंदेने त्याच्या खास स्टाईलने रसिकांची मने जिंकली आहेत. कोणतेही गाणे असो आदर्श ते एका वेगळ््या ...
आदर्श म्हणतोय, चल प्रेमाची कुस्ती खेळूया...
मराठी चित्रपटसृष्टीतील गायक आदर्श शिंदेने त्याच्या खास स्टाईलने रसिकांची मने जिंकली आहेत. कोणतेही गाणे असो आदर्श ते एका वेगळ््या उंचीवर घेऊन जातो. आपल्या आवाजातील एक लकब आणि रांगडेपण आदर्शच्या प्रत्येक गाण्यात जाणवतेच. आता असेच एक धमाल मराठी गाणे आदर्शने नुकतेच गायले आहे. मराठी चित्रपट संगीतात अनेक नवीन प्रयोग होत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरताहेत. याच पार्श्वभूमीवर ओढ.. द अॅट्रॅक्शन या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या शैलीतील संगीत ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक धमाल युथ साँग गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आले. सोनाली एंटरटेनमेंट हाऊस निर्मित, जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन प्रस्तुत ओढ चित्रपटाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर यांचे आहे. अंगात नखरा डोळ्यात मस्ती.. चल प्रेमाची खेळूया कुस्ती.. असे बोल असणाºया कौतुक शिरोडकर लिखित या गीताला संगीतकार प्रवीण कुंवर यांनी सुरेल संगीताची साथ दिली आहे. धमाल मस्तीच्या अंदाजातले हे गीत गायला मिळाल्याबद्दल आदर्श शिंदे यांनी ओढचे संगीतकार, दिग्दर्शक व निमार्ता यांचे विशेष आभार मानले. डीजेवर ताल धरायला लावणारं हे गीत प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास आदर्श शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॉलेज गँदरिंगच्या जल्लोषपूर्ण वातावरणात हे गीत लवकरच चित्रीत करण्यात येणार आहे. आता आदर्शच्या गाण्यांना प्रेक्षकांनी याआधी जेवढे डोक्यावर घएतले होते. तेवढीच पसंती या कुस्ती खेळूया गाण्याला मिळतेय का हे तर आपल्याला लवकरच समजेल.