Join us  

​मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटात निर्मिती सावंत बोलणार वऱ्हाडी भाषा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 12:26 PM

निर्मिती सावंत मराठी चित्रपट सृष्टीतील एक कमाल व्यक्तिमत्त्व, ज्यांच्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागतं. एका मोठ्या ...

निर्मिती सावंत मराठी चित्रपट सृष्टीतील एक कमाल व्यक्तिमत्त्व, ज्यांच्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागतं. एका मोठ्या गॅपनंतर ही कॉमेडी क्वीन आता पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवी सिंग यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या निर्मिती सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच  नागपूरमध्ये राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहेत. कोकणातल्या निर्मिती ताईच्या तोंडून वऱ्हाडी भाषा ऐकण्यात खरी गंमत येणार आहे. कोणतीही भूमिका साकारण्यापूर्वी नटाला त्या भूमिकेचा अभ्यास करावा लागतो हे आजवर आपण ऐकून होतो. पण मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटात निर्मिती ताईला बघितले की, एका कलाकाराचा अभ्यास काय असतो हे कळते. समीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटातील भूमिकेसाठी सेटवर कधीही हातात मोबाईल न दिसणाऱ्या निर्मिती ताईंच्या हातात सतत मोबाईल बघायला मिळाला. वऱ्हाडी साज पकडायचा तर तो पूर्णपणे शिकूनच या त्यांच्या हट्टापायी अभिनेत्री भारती पाटील यांना रात्री बारा वाजता उठवून त्यांच्याकडून संपूर्ण स्क्रिप्ट फोनवर रेकॉर्ड करून ती सतत ऐकत तो वऱ्हाडी भाषेचा साज, लहेजा, हेल शिकत त्यांनी या भूमिकेसाठी तयारी केली. इतकी वर्षं इंडस्ट्रीत काम करूनही वेगळ्या भूमिकेसाठी निर्मिती ताईंनी घेतलेली मेहनत आणि त्यांची जिद्द ही खरंच कौतुकास्पद आहे. तेव्हा 'मले कैच प्रॉब्लेम नाई' म्हणून राहिलेली निर्मिती ताई पाहायला नक्की या येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये...Also Read : 'डबल सीट'च्या प्रवासानंतर आता समीर म्हणतोय ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’