मंदार चोळकरसाठी कसे असणार २०१७
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 11:29 IST
सर्वप्रथम चारोळी आणि त्यानंतर कविता रचत गीतलेखनाकडे वळलेला मंदार आज तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय कवी झाला आहे. त्याच्या कविता संगीताच्या ...
मंदार चोळकरसाठी कसे असणार २०१७
सर्वप्रथम चारोळी आणि त्यानंतर कविता रचत गीतलेखनाकडे वळलेला मंदार आज तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय कवी झाला आहे. त्याच्या कविता संगीताच्या माध्यमातून लोकांच्या मुखी रुळलेल्या दिसून येत आहेत. त्याचे दुनियादारी सिनेमातील 'देवा तुज्या गाभाºयाला...' हे दर्दी गाणे असो. वा 'कट्यार काळजात घुसली या सिनेमातील 'मनमंदिरा' हे नाट्यगीत असो, मंदारने प्रत्येक स्तरावर आपल्या गीतलेखनाचा दर्जा उंचावत नेला आहे. चारोळ्यांनी सुरुवात करणाºया मंदार चोळकरने खºया अथार्ने २००९ सालापासून गीतलेखनासाठी सुरुवात केली. चारोळ्याचे कवितामय आयुष्य सुरु असताना योगिता चितळे या गायिकेच्या 'लाइफ इज ब्युटीफुल' या अल्बमसाठी मंदारने लिहिलेल्या एका गाण्याला निलेश मोहरीरने आपल्या संगीतातून आकार दिला. गीतलेखनाच्या या प्रवासात निलेश मोहरीरची मिळालेली ही सोबत मंदारच्या कारकिदीर्साठी परीसस्पर्श ठरला. त्यानंतर चार ओळींच्या आठ ओळी आणि त्यानंतर कविता अशी दरमजल करत मंदारने आजवर ७० मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे, ज्यात प्रामुख्याने श्यामचे वडिल, दुनियादारी, क्लासमेट्स, मितवा, आॅनलाईन बिनलाईन, शॉर्टकट, गुरू, फ्रेन्ड्स, मराठी टायगर्स, दगडी चाळ, पोरबाजार, कट्यार काळजात घुसली, बंध नायलॉनचे, फुंतरू, पिंडदान, वृंदावन, एक अलबेला, तालीम, कान्हा, फोटोकॉपी,वन वे तिकीट या सिनेमांचा समावेश आहे. रुस्तुम या हिंदी चित्रपटातील गाण्यांचे देखील मंदारने गीतलेखन केले आहे. विशेष म्हणजे मंदारने म्युजिक अल्बम तसेच काही जाहिरातींसाठीदेखील गीतलेखन केले आहे. मंदारने मराठीतील आघाडीच्या गायकांसोबातच अरिजित सिंग, शान, सोनू निगम, हरिहरन, शंकर महादेवन आणि आशा भोसले या हिंदीतील गायकांसाठी देखील गाणी लिहिली आहेत, तसेच रुस्तम या बॉलीवूड सिनेमासाठी एका गाण्याचे मराठी गीतलेखन मंदारने केले आहे. अशोक पत्की, श्रीधर फडके, अजय -अतुल, शंकर-एहसान- लॉय, अवधूत गुप्ते, चिनार महेश, प्रफुल कार्लेकर, निलेश मोहरीर अशा ६० पेक्षा अधिक संगीतकारांसोबत त्याने काम केले आहे. आता तो २०१७ मध्ये दमदार एन्ट्री करणार आहे. यंदा मंदार फुगे, खेळ, जो जो रे बाळा, जीत, रेडिओ नाईट्स, अगडबंब-२, कलटी, ग्रहण, ती आणि इतर, विसर्जन, सत्य, रामप्रहर, फुल आॅन, रोपटं, मिक्स व्हेज, भ्रम, शुभमंगल, हृदयांतर या सिनेमांमध्येही मंदारची लेखणी रसिकांना दर्जेदार गाण्यांचा आस्वाद देण्यास सज्ज झाला आहे.