Join us  

Hotness Overloaded! मिताली मयेकरचा बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 7:15 AM

मितालीच्या हॉट अदांवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मिताली सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. काही दिवसांपूर्वी मितालीने एक स्वतःचा हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. 'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असा हा मितालीचा सेक्सी आणि बोल्ड लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कदाचित ऑस्ट्रेलियात असतील.सिद्धार्थने याबाबत सांगितलं, की ‘हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं.

तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकर