Join us  

Hotness Overloaded!!! अमृता खानविलकरचा मालदिवमध्ये बोल्ड अन् स्टनिंग लूक, पहा तिचे घायाळ करणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 7:15 AM

अमृता खानविलकर सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे.

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या ती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. ती एकटी मालदीवला गेली नसून तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली खरे व तिची आईदेखील गेली आहे.

सध्या इंस्टाग्राम तिचे मालदिवमधील फोटो पहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. तिचे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

अमृताने मालदीवमधील देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमधून  अमृता व सोनाली मालदिवमध्ये खूप मजा करताना दिसत आहेत.

इतकेच नाही तर स्कुबा डायविंगदेखील केले.

त्याचा व्हिडिओदेखील इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 

अमृताने बिकनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच हॉट व ग्लॅमरस दिसतेय.  अमृताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.

याशिवाय हिंदी सिनेमातही अमृताने आपल्या अभिनयाने छाप पाडली. राजी, सत्यमेव जयते अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. मराठीत अमृताने अर्जुन, कट्यार काळजात घुसली, वेलकम जिंदगी, आयना का बायना अशा विविध सिनेमात काम केले आहे.

लवकरच अमृता 'पॉन्डेचेरी' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे.

या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यांत अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :अमृता खानविलकरसोनाली खरे