Join us

‘मोलोडिस्ट किव’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:14 IST

मराठी चित्रपट ग्लोबल होत आहे असे नूसते म्हटले जात नाही तर मराठी सिनेमाने सातासमुद्रापार जाऊन आपली मोहोर उमटविली आहे.आपला ...

मराठी चित्रपट ग्लोबल होत आहे असे नूसते म्हटले जात नाही तर मराठी सिनेमाने सातासमुद्रापार जाऊन आपली मोहोर उमटविली आहे.आपला मराठी चित्रपट इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहचला असुन परदेशी प्रेक्षक देखील मराठी सिनेमांची प्रशंसा करताना दिसत आहेत. ऐवढेच काय तर आता ब-याच सिनेमांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये आपली कमाल दाखवली आहे.समीत कक्कड दिग्दर्शीत 'हाफ तिकीट' या चित्रपटाला आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविला गेला आहे ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट ‘४७ व्या मोलोडिस्ट किव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ही (47th Molodist Kyiv International Film Festival) कौतुकास पात्र ठरला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘टीन स्क्रीन ज्युरी’ हा महत्त्वाचा पुरस्कार (‘Best Film’ Teen Screen Jury Main Prize)  ‘हाफ तिकीट’ चित्रपटाने या महोत्सवात पटकावला आहे.जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधणाऱ्या दोन लहानग्यांची धडपड ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून दिग्दर्शक समित कक्कड यांनी दाखवली आहे. युक्रेन देशाच्या किव या शहरात झालेल्या एका शानदार सोहळ्यात दिग्दर्शक समित कक्कड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.त्यांनी प्रेक्षक तसेच तिथल्या चित्रपट जाणकारांशी संवाद साधत या चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बालकलाकारांच्या अभिनयाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. याशिवाय ‘हाफ तिकिट’च्या यशस्वी दिग्दर्शनाबद्दल दिग्दर्शक समित कक्कड यांचे अभिनंदनही केलं.‘व्हिडिओ पॅलेस’च्या नानूभाई जयसिंघानिया यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘हाफ तिकीट’ या सिनेमाने प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंच;त्यासोबतच देश-विदेशातील २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘हाफ तिकिट’ ने आपला ठसा उमटवला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आपल्याकडे काही नवीन नाही. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना मराठमोळा तडका याआधी दिला गेलाय. चित्रपटाची गोष्ट माल-मसाला लावून, रंगवून प्रेक्षकांसमोर पेश करण्याची मजा या साऊथ सिनेमांमध्ये असते. 'काक मुत्ताई' या अशाच ऐका साऊथ सिनेमाचा रिमेक दिग्दर्शक समीत कक्कड यांनी मराठीमध्ये केला अन साऊथचा सिनेमाही फिका पडेल अशी दोन चिमुकल्यांची कथा त्यांनी 'हाफ तिकीट'च्या माध्यामातून पडद्यावर रंगवली आहे.