Join us  

मुंबईकरांसाठी करत असलेल्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान, हेमंत ढोमेचे लस घेतल्यानंतरचे ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 9:51 AM

अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला पाहून सरकारवर सतत टीका करत होता.

अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला पाहून सरकारवर सतत टीका करत होता. लसीकरण केंद्रावरची गर्दी आणि यामुळे सामान्यांना सोसावा लागत असलेला त्रास यावर भाष्य करणारी जळजळीत पोस्ट त्याने शेअर केली होती. हेमंत ढोमेने लसीचा पहिला ढोस घेतल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. 

बीकेसी जम्बो लसीकरण केंद्रावर लस घेतली! उत्तम सोईसुविधा! योग्य मार्गदर्शन! अद्ययावत यंत्रणा! खूप आपुलकीने विचारपुस करणारे कर्मचारी आणि डॅाक्टर्स!  @mybmc  धन्यवाद, लशींचं प्रमाण वाढायला हवं! मंडळी जाऊन लस घ्या!! लसीकरण करणं खूप खूप गरजेचं आहे! असं ट्विट करत हेमंतने राज्य सरकाराचे आभार मानले आहेत. 

त्यानंतर हेमंतने आणखी एक ट्विट केलं त्यात त्याने लिहिले, आपण मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी करत असलेल्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे... आपणांस अधिक बळ मिळो! राज्य आणि केंद्र सरकार दोन्हींचा पाठिंबा,तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच प्रयत्नांमुळे आपण सग्गळेच या महासंकटातुन लवकरात लवकर बाहेर येऊ हिच प्रार्थना! 

याआधी हेमंतने ‘सर्व नियम पाळणारा... सरकारला प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा... या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणूस आता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यासाठी) रांगेत उभा आहे. उन्हा तान्हाचा कुठल्याही सावलीशिवाय. खूप वय असलेला, थकलेला! कमीत कमी १ किलोमीटर तरी... हजारो लोक आहेत गेटवर. चेंगराचेंगरी. सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढं करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये..माणसाला माणसासारखं तरी वागवा..महासत्ता होणार म्हणे...महाथट्टा नक्कीच झालीय... ’ अशी केंद्र सरकारवर टीका करणारी पोस्ट केली होती. 

टॅग्स :कोरोनाची लस