Join us  

आर्या आंबेकरचा हा सरळ, साधा अवतार पाहिला का?, सोशल मीडियावर चर्चा तिच्याच फोटोची…

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:07 AM

आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

दहा दिवस गणेशोत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर  गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर आता घरी निवांत क्षण घालवतेय. आर्याने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अत्यंत साध्यासुध्या अवतारात आर्या पाहायला मिळत आहे. यात आर्या निवांतपणे पुस्तक वाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. आर्याने यात सैल असं स्वेटर परिधान केलंय. शिवाय मेकअपविना आर्याचा लूक आणखी खुलून गेल्याचं दिसत आहे. आर्याचा हा सरळ साधा लूक साऱ्यांनाच भावतो आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. गायनाबरोबरच अभिनयातही तिने नाव कमावलं आहे. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिनं मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते. आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. 

टॅग्स :आर्या आंबेकर