ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रूपेरी पडद्यावर रंगणार 'गाव थोर पुढारी चोर'एक पोलिटीकल सटायर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 14:31 IST
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण आणि भोवतालच्या वास्तवावर उत्तम भाष्य करण्यासाठी 'गाव थोर पुढारी चोर' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला ...
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रूपेरी पडद्यावर रंगणार 'गाव थोर पुढारी चोर'एक पोलिटीकल सटायर
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण आणि भोवतालच्या वास्तवावर उत्तम भाष्य करण्यासाठी 'गाव थोर पुढारी चोर' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीही राजकीय सटायर असलेली 'नागपूर अधिवेशन एक सहल','खुर्ची सम्राट', 'पुन्हा गोंधळ,पुन्हा मुजरा','शासन,'आजचा दिवस माझा' अशा अनेक सिनेमांतून राजकारणी रूपेरी पडद्यावर रंगताना पाहायला मिळाला.जनतेकडून राजकारण्यांना मिळणा-या भरघोस मतांप्रमाणेच रूपेरी पडद्यावरील रंगलेल्या राजकारणींनाही रसिकांकडून भरघोस पसंती मिळाली.मग तो हिंदी सिनेमा असो किंवा मराठी सिनेमा राजकीय घडामोंडीवर भाष्य करणा-या सिनेमा रसिकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरले.राजकारणाच्या मैदानात त्यातील डावपेच, छक्के-पंजे आणि हेवेदावे हे नसणार ते राजकारण कसले. त्यामुळे राजकारण म्हटले की आपसुकच सगळ्या राजकारण्यांचे चेहरे डोळ्यासमोर उभी राहु लागतात. राजकरणाचे सूत्र कधी बदलेल, आणि कोणाच्या खांद्यावर स्वार होऊन कोण कधी सत्ताधारी बनेल याचा काही नेम नाही. अशा या राजकारणी लोकांच्या इरसाल भानगडीचा आढावा घेणारा 'गाव थोर पुढारी चोर' हा आगामी मराठी सिनेमा रसिकांना पाहयला मिळणार आहे. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष असो, खुर्चीसाठी एकमेकांचे पाय खेचणाऱ्या पुढाऱ्यांवर निशाणा साधणारा हा विनोदी सिनेमा रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार असे प्रदर्शनापूर्वीच मत व्यक्त केले जात आहे.'गाव थोर पुढारी चोर' हा सिनेमा मनोरंजनासोबतच राजकीय कर्तव्याची जाणीव देखील प्रेक्षकांना करून देणारा असणार आहे.सिनेमात 'पॉलिटीकल' या भारदस्त शब्दाचा अर्थ अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पितांबर काळे यांनी केला आहे. निर्माते मंगेश डोईफोडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून राजकीय वर्तुळातील डावपेच विनोदीशैलीतून मांडणाऱ्या या सिनेमामध्ये दिगंबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.पुणे आणि दौंड या भागात सिनेमाचे शूटिंग करण्यात आले आहे.या सिनेमाच्या माध्यमातून मुंबईत रंगणा-या निवडणुकांपूर्वीच १७ फेब्रुवारीला रूपेरी पडद्यावर एक वेगळे राजकारण पाहायला मिळणार हे मात्र नक्की.