Join us

'उर्फी'साठी प्राजूकडून दगडूला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:28 IST

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या टाइमपास आणि टाइमपास २ चित्रपटातून आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ म्हणणारी प्राजू-दगडू म्हणजेच केतकी माटेगावकरची जोडी ...

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या टाइमपास आणि टाइमपास २ चित्रपटातून आई-बाबा आणि साईबाबाची शप्पथ म्हणणारी प्राजू-दगडू म्हणजेच केतकी माटेगावकरची जोडी मराठी चित्रसृष्टीत फेमस झाली. मात्र, आता एकीकडे केतकीचे गाण्यात करिअर सुरू असताना दुसरीकडे लवकरच या दगडूचा 'उर्फी' हा चित्रपट येत आहे. नुकत्याच एका इव्हेंटनिमित्त हे दोघे भेटले, तेव्हा प्राजूने दगडूला उर्फी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्याचे समजते.