Join us

Gautami Patil : “तो Video मी आईला पाठवला कारण…” तो प्रसंग सांगताना भर मुलाखतीत रडली गौतमी पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 4:39 PM

Gautami Patil Viral Video: मध्यंतरी एका कार्यक्रमात कपडे बदलतानाचा गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. अद्याप गौतमी पाटील या धक्कादायक प्रकारावर काहीही बोलली नव्हती..

Gautami Patil Viral Video: आपल्या लावणीच्या कार्यक्रमांतून धुमाकूळ घातलेली लावणी कलाकार व नृत्यांगनागौतमी पाटील  विविध कारणांमुळे चर्चेत असते. गौतमीला जितकं कौतुक मिळतं तितकंच टीकेलाही समोरं जावं लागतं. मध्यंतरी एका कार्यक्रमात कपडे बदलतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. अद्याप गौतमी पाटील या धक्कादायक प्रकारावर  काहीही बोलली नव्हती. पण आता एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. यावेळी बोलताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. @theoddEngineer या युट्युब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत गौतमी यावर बोलली.

तो व्हिडीओ मी आईला पाठवला...तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. खूप गोष्टी सहन केल्यात. जे कोणी हे कांड केलंय, त्याला काय बोलणार. तो व्हिडीओ पहिल्यांदा माझ्याकडे आल्यावर तो मी आईला शेअर केला. की तू बघ... तिला दुसरं कुणी पाठवला असता, तेव्हा कदाचित तिला ते सहन झालं नसतं. म्हणून मीच तिला तो व्हिडीओ पाठवला, असं म्हणताना गौतमीला अश्रू आवरता आले नाहीत.

पुढे ती म्हणाली,  त्या व्हिडीओनंतर माझ्यासोबत खूप काही गोष्टी घडल्या. त्या सर्व गोष्टी मी इथे सांगू शकत नाही. पाच सहा दिवस शो तर बंदच होते. मी तर पूर्णपणे खचून गेले होते. आता सगळं बंद..., असाच विचार मनात होता... पण माझ्यासोबतच्या पोरी, माझा ग्रूप, माझी आई सगळ्यांनी मला सावरलं. ज्याने कुणी हे केलंय, त्याला हेच व्हायला हवंय. तुझे कार्यक्रम बंद व्हावेत, हिने नाचू नये, हे त्याला हवं आहे, पण तू हे होऊ देऊ नकोस, असं मला सगळ्यांनी समजावलं. मला धीर दिला. त्याने नेमक्या कोणत्या कारणासाठी त्याने हा प्रकार केला मला माहीत नाही पण त्यानंतर मी नवी सुरूवात केली. अगदी नवी साडी शिवण्यापासून तयारी केली. त्या व्हायरल व्हिडिओचं प्रकरणानंतर मी लोकांना फेस करायला घाबरत होते. माझी मानसिकताच नव्हती. त्यानंतरच्या पहिल्या शोची पहिली एन्ट्री करताना धीर होत नव्हता. पण आयोजक, माझ्यासोबतच्या मुली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या चाहत्यांनी मला सपोर्ट केला नसता तर मी खचले असते. पण या पोरीसोबत काहीतरी घडलंय, हे त्यांनी मला जाणवू दिलं नाही. मी खूप घाबरले. काही कमेंट्स येतील का, काही होईल का, असं माझ्या मनात होते. पण माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मला प्रचंड सपोर्ट केला. दुसऱ्या एन्ट्रीला मी गेले अन् पार स्टेज गाजवून आले...

टॅग्स :गौतमी पाटीलनृत्यमराठी अभिनेता