Join us

मिळून चार चौघे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 11:49 IST

काही वर्षापूर्वी चार मित्र ऑर्कुटवर भेटले. समीर सामंत, श्रीपाद देशपांडे, प्राजक्त देशमुख आणि मंदार चोळकर अशी त्यांची नावे. प्रत्येकाला ...

काही वर्षापूर्वी चार मित्र ऑर्कुटवर भेटले. समीर सामंत, श्रीपाद देशपांडे, प्राजक्त देशमुख आणि मंदार चोळकर अशी त्यांची नावे. प्रत्येकाला कविता करण्याची आवड. ही आवड फक्त आवडीपर्यंतच मर्यादित राहू नये, त्यातून रसिकांशी संवाद साधत मनोरंजन करणे ही आयडियाची कल्पना त्यांना सुचली. यानंतर सुरु झाला Weचारचा काव्यानुभव देणारा प्रवास. गेल्या पाच वर्षापासून Weचार या स्टेज शो दरम्यान हे चारही मित्र मिळून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. आता 63 वा प्रयोग'पिटारा' (पॉकेट थिएटर) या संकल्पनेच्या माध्यमातून रंगणार आहे. Weचार हा स्टेज शो. यांत कोणत्याही प्रकारचे काव्यसंमेलन वाटावे असा प्रकार नसून एक सुखद भावनात्मक काव्यानुभव आहे.कवितेच्या माध्यमातून आम्ही चौघे मित्र रसिकांशी संवाद साधतो. कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी बॅकग्राऊड स्कोरचाही वापर करण्यात येतो. एका बंदिस्त हॉलमध्ये कवितेच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन आम्ही करतो. गेल्या पाच वर्षापासून Weचार हा शो करत आहोत. प्रत्येक प्रयोग एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. कारण कार्यक्रमाला येणा-या रिपीट ऑडियन्सकडून मिळणारी दादही आमच्यासाठी मोलाची आहे असे समीर सामंतने सांगितले. आजपर्यंत या कार्यक्रमाला येणारा रसिक हा प्रत्येक वयोगटातला असतो. त्यांच्याकडून मिळणा-या कमेंटसच आम्हाला ऊर्जा देऊन जातात. या कार्यक्रमातून मिळालेल्या रक्कमेतून वेगवेगळ्या संस्थानाही मदत करण्यात येते असे समीरने सांगितले.  आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत. आपापला नोकरी- व्यवसाय सांभाळत Weचारचे काव्यानुभव रसिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला खरं सांगायला गेलं तर तसं दडपण नव्हतं. आम्ही पुढे किती प्रयोग करणार, हा शो किती दिवस करू शकतो असले कोणतेही प्रश्न आमच्या डोक्यात नव्हते. विचार होता तो फक्त पहिला प्रयोग चांगला करण्याचा. पहिल्याच प्रयोगला नितिन केळकळर (सह्याद्री वाहिनीचे) आमच्या पहिल्या प्रयोगाला उपस्थित होते. त्यांनाही तो कार्यक्रम इतका आवडला की कार्यक्रमाचा वेगळेपणा ओळखत दूरदर्शनच्या संध्याकाळच्या बातम्यांमध्ये थेट एक वृत्तांत प्रसारित करण्यात आला. सह्याद्रीवरही अशा कार्यक्रमाचे प्रसारण होण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यानंतर या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढतच गेला, लोकप्रियता वाढत गेली. त्या दिवसांपासून सुरू झालेला आमचा हा प्रवास आजतागायत सुरू असून तो कायम ठेवण्याचा प्रयत्न यापुढेही करत राहणार. आज सोशल मीडियाच्या माध्यामातून क्षितिजं विस्तारली आहेत.पहिल्या प्रयोगावेळी येणारा रसिक आणि आता होणा-या प्रयोगावेळी येणारा रसिक यांच्यात फरक इतकाच की आमच्या प्रयोगाला रिपिट ऑडीयन्स वाढतोय. नेहमी रसिकांना नाविन्य देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हा कार्यक्रम साचेबध्द पठडीतला वाटत नाही. आमच्या सादर होणा-या कवितांमधून आजचा विषय मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे कॉलेज विद्यार्थ्यांनाही तो रिलेट होतो. आजपर्यंत Weचारच्या माध्यमातून रसिकांसह आमच्या चौघांसाठी एक भन्नाट अनुभव देत असल्याचे मंदार चोळकरने सांगितले.            चोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे खूप कमी वेळेत काय सादर करणार याची चर्चा करतो. कधी कधी दौरा करत असतानाच अमुकएक करणार असे ऐनवेळीच ठरतं. कधी तर मंदार कोणती कविता सादर करणार याची कुणालाही पूर्वकल्पनाही नसते. जेव्हा ती कविता मंदार किंवा श्रीपाद सादर करतात त्यावेळी रसिकांसह थोड्या काळासाठी आम्हीही स्टेजवर श्रोते बनतो. असे भन्नाट प्रयोगही आमच्यात होतात. अनेकदा असंही होते आमच्यापैकी प्रत्येकालाच स्वतःच्या कवितेपेक्षा दुस-यानेच सादर केलेली कविता जास्त भावते.अशाप्रकारे मजामस्ती करत आम्ही हा कार्यक्रम सादर करतो. विशेष म्हणजे रसिकांनासुद्धा ते अतिशय आवडतं.आपण जसं मित्रांशी कोपरखळ्या मारत, चिमटे काढत गप्पागोष्टी करत बोलतो, तसा मराठी कवितांचा कार्यक्रम हा सगळ्यांसाठीच एक वेगळा विशेष अनुभव असतो. Weचार सुरू होण्यापूर्वी आम्ही चौघे चांगले मित्र तर होतोच,Weचारमधून कलाकार म्हणूनही आमची मैत्री आणखी घट्ट होत गेली असे प्राजक्त देशमुख अभिमानाने सांगतो.