Join us  

आगामी 'असेही एकदा व्हावे'या चित्रपटातून प्रथमच एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 5:19 AM

सध्या सारेच पतंगबाजी उडवण्यात बिझी असताना आपले आवडते कलाकार तरी कसे मागे राहाणार.मग काय मकरसंक्रातीचे निमित्त साधत ढिल दे ...

सध्या सारेच पतंगबाजी उडवण्यात बिझी असताना आपले आवडते कलाकार तरी कसे मागे राहाणार.मग काय मकरसंक्रातीचे निमित्त साधत ढिल दे दे रे भैय्या म्हणत तेजश्री प्रधान आणि  उमेश कामत दोघेही गुंतलीय पतंगबाजी करण्यात यांनी नुकताच मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी तेजश्री आणि उमेश दोघांसाठी दुहेरी आनंद आहे कारण हे एक तर मकर संक्रात आणि दुसरे म्हणजे नवीन सिनेमाच्यामाध्यमातून हे पहिल्यांदाच ही नवीन जोडी एकत्र रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाच्या निमित्ताने हि जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत झळकणार असून नुकतेच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान या सिनेमाचा टीझर मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आला. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या कार्यक्रमात उमेश आणि तेजश्रीने उपस्थितांना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या.शिवाय पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंददेखील लुटला. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची श्री मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली आहे.त्यांना याकरिता त्यांचे मित्र श्री रविंद्र शिंगणें यांचें सहकार्य लाभले.नुकताच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझर मोशन पोस्टरवरून हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचा अंदाज येतो. तेजश्री आणि उमेश कामत व्यतिरिक्त शर्वाणी पिल्लईचीदेखील यात महत्वाची भूमिका आहे.प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा सिनेमा येत्या ६ एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.Also Read:नववधू तेजश्री प्रधान? …..काहीही हं !!! सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटोतेजश्रीचे लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील तेजश्रीचा एक फोटो सध्या सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो.विशेषतः तिच्या फॅन्ससाठी तेजश्रीचा हा फोटो उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या फोटोत तेजश्री एका नववधूप्रमाणे नटून बसल्याचे पाहायला मिळते आहे. आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, नाकात भली मोठी नथ, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अवतारात तेजश्री पाहायला मिळते आहे. या अवतारात तेजश्रीचं सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.आता फोटो नेमका कधीचा आणि कसला आहे अशा चर्चा सुरु आहेत.