‘विठ्ठला शपथ’ चे फर्स्ट पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 12:41 IST
विठ्ठलभक्ती आणि त्याविषयासंदर्भात अनेक चित्रपट आत्तापर्यंत साकारलेले आहेत. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य आणि लाडके दैवत म्हणजे विठ्ठल हाच मराठी चित्रपटसृष्टीचा ...
‘विठ्ठला शपथ’ चे फर्स्ट पोस्टर रिलीज
विठ्ठलभक्ती आणि त्याविषयासंदर्भात अनेक चित्रपट आत्तापर्यंत साकारलेले आहेत. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य आणि लाडके दैवत म्हणजे विठ्ठल हाच मराठी चित्रपटसृष्टीचा कथानकासाठी आवडीचा विषय ठरतो.‘विठ्ठला शपथ’ या मराठी चित्रपटाचे न्यू आॅफिशियल पोस्टर नुकतेच आऊट झाले आहे. गुरूदर्शन फिल्म्स दिग्दर्शित आणि चंद्रकांत पवार निर्मित ‘विठ्ठला शपथ’ या चित्रपटाचे पोस्टर अत्यंत वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे.श्रद्धेवर आधारित चित्रपट असून अंधश्रद्धेला यात अजिबात थारा नाही असे दाखवण्यात आले आहे. स्थानिक ठिकाणांवर चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे.दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून कौस्तुभ सावरकर आणि भानुदास पन्मंद यांनी डायलॉग लिहिले आहेत. गाणी क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. source : marathi stars