पहिल्या मराठमोळी अभिनेत्रीचे अॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 19:35 IST
Exculsive - बेनझीर जमादार पप्पी दे...पप्पी दे या गाण्यातून ...
पहिल्या मराठमोळी अभिनेत्रीचे अॅप
Exculsive - बेनझीर जमादार पप्पी दे...पप्पी दे या गाण्यातून प्रेक्षकांना आपल्या ठेकयावर नाचायला भाग पाडणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. स्मिता ही खास आपल्या चाहत्यांसाठी एका अॅपच्या माध्यमातून संपर्कात राहणार आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीची खबर आता तिच्या चाहत्यापर्यत पोहचण्यास सोयीस्कर होणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना स्मिता म्हणाली, या अॅपमुळे मला माझ्या चाहत्यापर्यत पोहोचण्यास सोपे होणार असल्याने याचा आनंद होत आहे. कारण चाहते असतील तर कलाकार आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रत्येक ओपेनियन, कमेंट हे माझ्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण प्रेक्षकांना काय आवडतं हे प्रत्येक कलाकारासाठी महत्वाचे असते. तसेच हे अॅप लॉन्च केले म्हणजे माझ्यासाठी एक जबाबदारीचे काम आहे. आणि या जबाबदारीला मी माझ्या प्रेक्षकांना नक्कीच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास देखील तिने व्यक्त केला आहे. तसेच बॉलीवुडमध्ये अभिनेत्री सोनम कपूर हिच्या अॅपची मध्यंतरी चांगलीच चर्चा रंगली होती. आता या मराठमोळी अभिनेत्रीचे हे अॅप म्हणजे मराठी इंडस्ट्रीच्या यशाची पावतीच म्हणावी लागेल.