Finally अमेय वाघच्या डेटिंगमागचं सत्य बाहेर आलं !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 16:26 IST
अभिनेता अमेय वाघ यांच्या फिमेल फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. काही दिवसांपूर्वी काळजाचे तुकडे तुकडे करणा-या एका बातमीनंतर खुद्द अमेयनं ...
Finally अमेय वाघच्या डेटिंगमागचं सत्य बाहेर आलं !
अभिनेता अमेय वाघ यांच्या फिमेल फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. काही दिवसांपूर्वी काळजाचे तुकडे तुकडे करणा-या एका बातमीनंतर खुद्द अमेयनं आता त्याच्या फिमेल फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी ऐकून अमेयच्या फिमेल फॅन्सचा जीव भांड्यात नक्कीच पडेल. ही बातमी म्हणजे अमेय वाघ अजूनही ‘सिंगल’ आहे. हे आम्ही नाही तर खुद्द अमेयनं स्पष्ट केलं आहे. “मी आणि मिथीला एकमेंकांना डेट करत आहोत, मात्र ते एका सिनेमात. आम्ही दोघंही कपल आहोत तेही याच सिनेमात. मात्र मी सिंगल आहे. असं असलं तरी या सिनेमाच्या प्रेमात मी पडलो आहे.” अशी पोस्ट खुद्द अमेयनं टाकली आहे. तो एवढ्यावरच थांबलेला नाही. ज्यांना आपल्या आणि मिथीलाच्या अफेअरच्या बातम्या ख-या वाटल्या. ज्यांना आम्ही चांगले कपल वाटलो त्यांना हा आपला नवा मराठी सिनेमा मुरांबा एक गिफ्ट असल्याचे अमेयनं म्हटले आहे. या सिनेमात रसिकांना अमेय आणि मिथिलाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.दुनियादारीच्या यशानंतर अल्पावधीतच अमेय रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. 'घंटा' या सिनेमातही त्याने काम केले आहे. कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण, भडिपा या कार्यक्रमांची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली. मात्र व्हेंन्टाईन डेच्या दिवशी अमेयनं एक पोस्ट टाकली ज्यामुळे अनेक मुलींचं जणूकाही हार्टब्रेकच झालं. युट्यूब सेन्सेशन मिथिला पारकरसोबत कटिंग चहा पितानाचा फोटो अमेयनं सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या फोटोसोबत त्याने फायनली माय व्हॅलेन्टाईन अशी एक कमेंटही टाकली. त्यानंतर या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्यावर कमेंट आणि लाईक्स सुरु झाले. मात्र अनेक तरुणींची मनं या पोस्टमुळे दुखावली गेली. कारण या तरुणींमध्ये अमेय लाडका आहे.त्यावेळी अमेयचे खरोखर अफेअर आहे की त्याचा हा प्रमोशन फंडा आहे अशा चर्चाही रंगल्या होत्या. कारण अमेय प्रमोशनसाठी विविध आयडियाच्या कल्पना रंगवण्यात पटाईत आहे. अमर फोटो स्टुडिओ नाटकाच्या वेळीसुद्धा अमेयनं नाटकाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर भन्नाट रंगवून आणली होती. आता मुरांबा सिनेमाच्या निमित्ताने मात्र अमेयचा आणखी एक हटके प्रमोशन फंडा जगासमोर आलाय. त्यामुळे भविष्यात अमेयनं अशी काही फिरकी घेतल्यास काळजी करु नका... कदाचित तो त्याचा नवा प्रमोशन फंडा असेल नाही का ?