"दाटला अंधार हा
सोबती नाही कुणी
भासले जे आपुले
निसटले हातातूनी..."
सावनी रविंद्र आणि अभय जोधपूरकर यांच्या आवाजातील ‘निराधार’ हे ‘पिंडदान’ चित्रपटातील गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आणि कमी वेळातच या गाण्याची भुरळ प्रेक्षकांवर पडली.
या गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिलं आहे तर सागर धोतेंनी हे गाणं संगीतबध्द केलं आहे. पॉला मॅकग्लिन, सिध्दार्थ चांदेकर आणि मनवा नाईक यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. सारथी एंटरटेनमेंट्स आणि उदय पिक्चर्स निर्मित आणि प्रशांत पाटील दिग्दर्शित ‘पिंडदान’ चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. “पॉला, सिध्दार्थ, मनवा तुमच्यावर कोणीतरी खूप प्रेम करतंय”, असे प्रत्येक प्रेक्षक हमखास बोलत असणार. पॉला, सिध्दार्थ आणि मनवावर चित्रित झालेलं गाणं नक्कीच तुम्हांला आवडेल-