Join us  

“सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 3:48 PM

सध्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे.15 दिवसांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद याची यादी जाहीर होताच सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.

'फँड्री' सिनेमातील शालू म्हणजे राजेश्वरी खरात सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते.फँड्री सिनेमातली शालू ख-या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहे.सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. दिवसेंदिवस ती अधिकच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये ती पाहायला मिळते. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोना चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स असतात. राजेश्वरी तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते. ख-या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे. 

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय आहे.अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तिने अफलातून यश मिळवले आहे.तिने साकारलेली शालूची भूमिकाही प्रचंड गाजली होती़. तिच्या चेह-यावरचे हावभाव, तिचा सहजसुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता. ही शालू आज काय करेत ? असा प्रश्न पडणा-यांसाठी सोशल मीडियावर त्याचे उत्तर मिळेल.

 

ती सध्या काय करते याचाही अंदाज तुम्हाला त्यावरुन यईल. कोरोनाकाळातही शालूचा प्रंचंड बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन आणि शालूचा काय संबंध असाही प्रश्न तुम्हाला पडेल. लॉकडाऊनदरम्यान भन्नाट मिम्स सध्या सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सध्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे.15 दिवसांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद याची यादी जाहीर होताच सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. यात  शालूच्या चाहत्यांचीही भर पडली आहे. त्यांनी तर थेट शालूच्या नावाचा वापर करुनच त्यावर मीम्स बनवायला सुरुवात केली. 15 दिवसांसाठी संचारबंदीसह कठोर नियम लागू केले आहेत. बागबगिचे, मैदानं, मॉल, सिनेमागृह, बीच यासारखी गर्दीची ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. शालूच्या चाहत्यांनी त्यावरुनही मीम्स तयार केले आहेत.त्यामुळे ​कोरोना काळातही राजेश्वरी खरातची चर्चा होत आहे. 

 

“सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते” अशा आशयाची मिम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.