फॅन्ड्री चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने साकारली होती. या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली होती. त्यानंतर आता तो एका नव्या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे. फ्री हिट दणका. हा सिनेमा १७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात सोमनाथ अवघडे दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे.
ग्रामीण कथेवर आधारित फ्री हिट दणका या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील मगरे यांनी केले आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.