Join us  

"तुम्ही अभिनय सोडू नका", 'शिवपुत्र संभाजी' नाटक पाहिल्यानंतर अमोल कोल्हेंना चाहतीचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 2:34 PM

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा थरार अनुभवल्यानंतर एका चाहतीने अमोल कोल्हेंना पत्र लिहिलं आहे. 

अमोल कोल्हे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. पेशाने डॉक्टर असलेले अमोल कोल्हे अभिनेत्याबरोबरच खासदारही आहेत. अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत त्यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. आजही प्रेक्षक त्यांना ऐतिहासिक भूमिकेत बघणं जास्त पसंत करतात. अमोल कोल्हेंचं 'शिवपुत्र संभाजी' हे नाटकही प्रचंड गाजत आहे. 

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यातून अमोल कोल्हे प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यांचं हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. या नाटकाचा थरार अनुभवल्यानंतर एका चाहतीने अमोल कोल्हेंना पत्र लिहिलं आहे. 

अमोल कोल्हेंना चाहतीचं पत्र

माझ नाव ऋचा बिडवई आहे आणि मी पुण्यात राहते. मी भोसरीला आले होते 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग बघायला. मला अगळी जवळून ह्या महानाट्याचा थरार अनुभवायला मिळाला. मला हे महानाट्य खूप आवडलं. आजच्या पिढीमध्ये आपल्या इतिहासाबद्दल जागरुकता पसरविण्याचे तुमचे कार्य मोठं आणि छान आहे. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. पण, भेटता नाही आलं. म्हणून हे पत्र लिहित आहे. जेणेकरून, माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा.

मला पण इतिहासाची खूप आवड आहे. मी नऊ वर्षांची असल्यापासून तुमची खूप मोठी चाहती आहे. तुम्हाला टी.व्हीवर बघतच मी मोठी झाले. तुमच्यामुळेच छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे घराघरांत पोहोचले. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिकासुद्धा अगदी नियमितपणे पाहिली आहे. इतक्या वर्षांनी तुम्हाला प्रत्यक्ष पाहता आलं...हा खुप भावुक क्षण होता. खूप आनंद झाला. एक चाहती म्हणून खूप इच्छा आहे की अभिनेते अमोल कोल्हे यांना आम्ही अजून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघावं.

एक चाहती म्हणून मनापासून विनंती आहे की तुम्ही प्लीज अभिनय कधीच सोडू नका. आमच्या चाहत्यांचं प्रेम असंच नेहमी तुमच्यासोबत असणार आहे. आद्या रुद्र आणि टायगरला पण खूप प्रेम. तुम्ही आणि तुमचा परिवार असेच स्वस्थ आणि आनंदी राहो. तुमची खूप प्रगती होवो हीच प्रार्थना. एक ना एक दिवस आपली भेट व्हावी अशी आशा आहे, We love you so much sir! धन्यवाद. 

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेमराठी अभिनेतासेलिब्रिटी