तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरने सुयश टिळकसोबत साजरा केला पाडवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 11:42 IST
तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरने सुयश टिळकसोबत नुकताच पाडवा साजरा केला आणि इन्स्टाग्रामला फोटो देखील पोस्ट केला.
तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरने सुयश टिळकसोबत साजरा केला पाडवा
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांची ही आवडती मालिका आहे. ही व्यक्तिरेखा अक्षया देवधर साकारत असून तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या व्यक्तिरेखेत अंजली बाई आणि राणा यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा होते. पण खऱ्या आयुष्यात या अंजलीबाईंची म्हणजेच अक्षयाची जोडी दुसऱ्याच एका अभिनेत्यासोबत जमली आहे. अभिनेता सुयश टिळक आणि अक्षया यांच्या लव्हस्टोरीची तर सध्या चांगलीच चर्चा आहे. अक्षया आणि सुयशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते दोघे नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिवाळीतील पाडवा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येकासाठी हा सण अतिशय महत्त्वाचा असतो. अक्षय आणि सुयशने देखील नुकताच पाडवा खूप चांगल्या प्रकारे साजरा केला. त्यांनी हा पाडवा एकत्र साजरा केला असून या पाडव्याचे फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोत सुयश आपल्याला दाक्षिणात्य पेहरावात पाहायला मिळत आहे. यावर अक्षयाने खूप छान कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझे दक्षिणेवरचे प्रेम... खूप चांगले क्षण, पाडवा सेलिब्रेशन... जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा माझ प्रत्येकच दिवस ही दिवाळी असते. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा... सुयश आणि अक्षयाच्या या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियीवर चांगलीच गाजत आहे. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी हा फोटो लाइक केला आहे. या फोटोची चर्चा होत असतानाच अक्षयाने नुकताच सुयश सोबतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात मिसिंग... अंतर ही केवळ एक परीक्षा आहे की, ज्यात प्रेम तुमच्यासाठी किती प्रवास करू शकतं हे पाहिले जाते असे कॅप्शन लिहिले आहे.सुयश हा देखील छोट्या पड्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. का रे दुरावा या मालिकेतील जय या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. Also Read : तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर सुयश टिळकला म्हणतेय, Missing You …Love