Exclusive! संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांनी केला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 13:23 IST
देवयानी या मालिकमुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या मालिकेतील तुमच्यासाठी काय पण हा त्याचा संवाद चांगलाच ...
Exclusive! संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांनी केला साखरपुडा
देवयानी या मालिकमुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या मालिकेतील तुमच्यासाठी काय पण हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता. तर खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. तिने तू भेटशी नव्याने, पारिजात यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून तारक मेहता का उल्टा चष्मा, सिंहासन बत्तीसी यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिने नुकतेच तेरे बीन या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. संग्राम आणि खुशबू या दोघांनाही प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहे. या दोघांच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आहे. त्या दोघांनी अत्यंत साधेपणाने साखरपुडा केला असून या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगला फिरत आहेत. संग्राम साळवी आणि खुशबू तावडे चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये झळकले होते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा मौसम आला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी कोंबडी पळाली फेम क्रांती रेडकरने लग्न केले होेते. आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री नुकतेच रेशीमगाठीत अडकले आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे,श्रृती मराठे, पल्लवी पाटील, मनवा नाईक, मयुरी वाघ या अभिनेत्री नुकत्याच लग्नबंधनात अडकल्या आहेत.संग्राम आणि खुशबू यांनी सीएनएक्स मस्तीकडून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.