Exclusive नेहा जोशी झळकणार लघुपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 15:57 IST
बेनझीर जमादारका रे दुरावा या मालिकेतील रजनी म्हणजेच अभिनेत्री नेहा जोशी हिने खलनायिकेच्या भूमिकेतदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य ...
Exclusive नेहा जोशी झळकणार लघुपटात
बेनझीर जमादारका रे दुरावा या मालिकेतील रजनी म्हणजेच अभिनेत्री नेहा जोशी हिने खलनायिकेच्या भूमिकेतदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अशी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आता प्रेक्षकांना लघुपटातदेखील पाहायला मिळणार असल्याचे नेहाने लोकमत सीएनएक्सला सांगितले आहे. नेहा सांगते, हो, मी उकळी नावाचा लघुपट करत आहे. हा लघुपट ओंकार कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. त्याचबरोबर त्याने लिखाणदेखील केले आहे. ओंकारने यापूर्वी वजनदार या चित्रपटातील गोलू पोलू हे गाणे लिहिले आहे. या लघुपटात माझ्यासोबत विभावरी देशपांडे, उमेश जगताप या कलाकारांचा समावेश आहे. तसेच अनाही जोशी ही बालकलाकारदेखील झळकणार आहे. जसं आपल्या मनामध्ये सुख, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळया भावना असतात याबरोबरच हिंसा ही देखील भावना आपल्यामध्ये असते. मात्र बुद्धीचा वापर करून आपण त्या भावनेवर ताबा ठेवू शकतो. ज्यावेळी या हिंसेला वाट मिळते त्यावेळी ती कशा रूपाने बाहेर पडते. ही जी मूळप्रवृत्ती असते आपल्यामध्ये याविषयी हा लघुपट असणार आहे. मी या लघुपटात गृहिणीची भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच यापूर्वीदेखील मी ओंकारसोबत एक लघुपट केला आहे. नेहाने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखविली आहे. पोस्टर बॉइज, स्वप्न तुझे नी माझे, झेंडा, हवा हवाई, सुंदर माझे घर असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या रियालिटी शोमध्येदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच ती सध्या मराठी आणि हिंदी नाटकामध्येदेखील व्यग्र असल्याचे तिने यावेळी सांगितले.