Join us  

Engaged : सिद्धार्थ चांदेकरचे होणार दोनाचे चार हात, मिताली मयेकरसह झाला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 6:01 PM

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या दोघांचा चांगला मित्र सुयश टिळकनेच फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, अमेय वाघ, शशांक केतकर, आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचा समावेश होणार आहे. कारण नुकताच या दोघांचा साखरपुडा झाला आहे. या दोघांचा चांगला मित्र सुयश टिळकनेच फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.

 

या फोटोत दोघांची रोमँटीक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे  सिद्धार्थ आणि मिताली दोघंही एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि मिताली दोघंही गोव्यात सध्या एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

याआधी सिद्धार्थ आणि शनाया फेम रसिका यांच्यातील प्रेमाची चर्चा होती. सिद्धार्थ आणि रसिका कायमच एकत्र पाहायला मिळायचे. कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत. मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा होती.याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत गेल्याचे पाहाला मिळाले होते.  

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरसुयश टिळक