Join us  

"डॉ. तात्या लहाने अंगार ... पावर इज विदीन” सिनेमाचे कलाकारांच्या उपस्थितीत थाटात म्युझिक लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 5:36 AM

"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची" लवकरच रूपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवता येणार आहे.पद्मश्री डॉ. तात्या लहाने यांच्या ...

"कथा मातृत्वाची, कथा संघर्षाची, कथा त्यागाची, कथा जिद्धीची" लवकरच रूपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवता येणार आहे.पद्मश्री डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा "डॉ. तात्या लहाने अंगार... पॉवर इज विदीन" या चित्रपटाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटतच चाललाय.अशा या चित्रपटाच्या गाण्याचा दिमाखदार प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.यावेळी मकरंद अनासपुरे,अलका कुबल, डॉ. निशिगंधा वाड, साधना सरगम, चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विराग मधुमालती वानखडे, सहाय्यक निर्मात्या वंदना वानखडे, चित्रपट सादरकर्ते रीना अग्रवाल आदी.मान्यवर उपस्थित होते.चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम नोंदविलेल्या 'काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू' या गीताचे साधना सरगम आणि विराग यांनी सादरीकरण करून आनंद द्विगुणीत केला.संपूर्ण महाराष्ट्रातील गावा-गावात या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच शाळा व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बुकिंग केले आहे.लायन व रोटरी क्लब तर्फे देखील गरीब विद्यार्थ्यांना व आश्रम शाळांना या चित्रपटाचा लाभ घेता यावा म्हणून ग्रुप बुकिंग ची मागणी केली आहे."डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट यांची निर्मिती असून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डॉ.तात्या लहाने यांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून कसे त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी तात्यांना दान करून त्यांना पुनर्जन्म देऊन समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेशही यातून दिला आहे.डॉ.लहानेंचा ध्यास,कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. डॉ. तात्या लहाने यांची ही "बायोपिक" आजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.हा चित्रपट समाजाला नवीन दिशा व विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास चित्रपटाच्या विशेष सादरीकरणानंतर समाजातील प्रत्येक घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.