Join us

डॉ. मोहन आगाशे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 09:49 IST

स्पो हा युथ थिएटर फेस्टिव्हल  २४ डिसेंबर २०१७ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला. यात फुल लेन्थ प्ले (एक अंकी नाटक), ...

स्पो हा युथ थिएटर फेस्टिव्हल  २४ डिसेंबर २०१७ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला. यात फुल लेन्थ प्ले (एक अंकी नाटक), फ्रिंज परफोर्मंस, प्लँटफोर्म परफोर्मंस आणि लाईव्ह म्युझिक होते. या सोबतच विविध कार्यशाळा, रंगमंच खेळ, वाचन आणि वस्तू संग्रहालय असे सगळे उपक्रम देखील पाहायला मिळाले.मुंबई, दिल्ली, लखनऊ अश्या सर्व ग्रुपला मागे टाकून या वर्षी खटारा या अहमदनगरच्या नाटकाने बाजी मारली. थेस्पोच्या १८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचाचे “खटारा” या नाटकाची निवड झाली होती.“खटारा” हे नाटक ग्रामीण भागातील शेतकरी समाजावर आधारित आहे. परिस्थिती नुसार लोकांचे विचार बदलत आहेत, सवयी बदलत आहेत याचा अर्थ  असे का ,कि  जे जुने चांगले विचार आहेत आताच्या काळात प्रचलित नाहीत आणि ते काय खटारा झाले आहेत का ? असा विचार करायला लावणारे हे नाटक होते.“थेस्पो १९ चे हे सात दिवस खूप मस्त होते थेस्पोमुळे खूप तरुणांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले असेल ह्याची मला खात्री आहे. यावर्षी डॉ. मोहन आगाशे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले याबद्दल आम्ही खूप खुश आहोत.” असे फेस्टीव्ह मँन्जर श्रीष्टी यांनी सांगितले.थेस्पो१९ चे विजेते*  उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अहमद रझा खान (नाटक - मै, मेरा बाजा और वो)*  उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (स्त्री) – अर्चना साठे (नाटक – खटारा)*  उत्कृष्ट एसेम्बल – नाटक त्रिकोन का चौथा कोन?*  उत्कृष्ट लेखण – अमोल साळवे (नाटक – खटारा)*  उत्कृष्ट सेट डिझाईन (डेरेक जेफ्रेयिस पुरस्कार) – प्रमोद कसबे आणि निर्मिती टीम (नाटक – खटारा)*  उत्कृष्ट अभिनेता – सागर कुमार (नाटक - त्रिकोन का चौथा कोन?)*  उत्कृष्ट अभिनेत्री – मोनिका बनकर (नाटक – खटारा)*  उत्कृष्ट दिग्दर्शक – अमोल साळवे (नाटक – खटारा)*  उत्कृष्ट नाटक – अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचाचे “खटारा”दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या थेस्पो १९ अवार्ड्स नाईट मध्ये श्री. डॉ. मोहन आगाशे यांना थेस्पो १९ चा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात बोलताना रंगकर्मी डॉ.मोहन आगाशे यांनी सांगितले की “थिएटरमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप अनमोल आहे. मला अस वाटत की आपण जेव्हा वयस्कर/मोठे होतो, तेव्हा आपल्याला कळते कि कोणते क्षण मोलाचे आहेत. कला हि अशी एकमेव गोष्ट आहे जी सर्व लोकांना एकत्र आणते. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना स्वताचे करियर निवडण्यास स्वातंत्र्य दिले पाहिजे. आजच्या युवापिढीसाठी “थेस्पो” हे खूप सर्वोत्तम व्यासपीठ आहे. मला येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.”यावर्षी मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता, नागपूर, इस्लामपूर (सांगली), उडुपी, लखनऊ, अहमदनगर, जयपूर, बडोदा, गांधीनगर, अहमदाबाद, चेन्नई आणि इस्लामाबाद (पाकिस्तान) अश्या १९ शहरांनी नोंदणी केली होतीव ह्यात १८२ नोंदणी झाल्या ज्यात देशभरातील १४१ नाटकं आणि ४१ प्लॅटफार्म पर्फोर्मंसचा सहभाग आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, अवधी, बंगाली, तमिळ, मल्याळम, हिंदुस्तानी, हरयाणवी, कन्नड आणि तेलगु अश्या विविध भाषांमध्ये येथे नाटकं सादर झाले.